तेलंगणातील पहिला तृतीयपंथी उमेदवार बेपत्ता, मतदार संघात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 11:20 AM2018-11-28T11:20:16+5:302018-11-28T11:32:42+5:30

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात पहिल्यांदाच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) उमेदवार निवडणूक लढवत आहे. मात्र, हा उमेदवार मंगळवारपासून बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

Telangana transgender candidate Chandramukhi Muvvala goes missing | तेलंगणातील पहिला तृतीयपंथी उमेदवार बेपत्ता, मतदार संघात खळबळ

तेलंगणातील पहिला तृतीयपंथी उमेदवार बेपत्ता, मतदार संघात खळबळ

Next
ठळक मुद्देतेलंगणातील पहिल्या तृतीयपंथी उमेदवार बेपत्ताबहुजन डाव्या आघाडीच्या उमेदवार 7 डिसेंबरला तेलंगणातील विधानसभेच्या 119 जागांसाठी निवडणुका होणार आहेत.

हैदराबाद : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात पहिल्यांदाच तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) उमेदवार निवडणूक लढवत आहे. मात्र, हा उमेदवार मंगळवारपासून बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.  

चंद्रमुखी असे या उमेदवाराचे नाव आहे. चंद्रमुखी या बहुजन डाव्या आघाडीच्या उमेदवार आहेत. त्या हैदराबादमधील गोशमहल मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मुकेश गौड यांचे तगडे आव्हान आहे. याचबरोबर, भाजपाचे टी. राजा आणि टीआरएसचे प्रेम सिंह राठोड याच मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र, मंगळवारपासून चंद्रमुखी त्यांच्या घरातून बेपत्ता झाल्या आहेत. त्यामुळे मतदार संघात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रमुखी यांचा पोलीस शोध घेत आहेत. 


दरम्यान, येत्या 7 डिसेंबरला तेलंगणातील विधानसभेच्या 119 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.    
 

Web Title: Telangana transgender candidate Chandramukhi Muvvala goes missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.