शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
5
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
6
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
8
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
9
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
10
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
11
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
12
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
13
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
15
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
16
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
17
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
18
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
19
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस

टेलिकॉम कंपन्यांना दोन वर्षांपर्यंत सुरक्षित ठेवावे लागणार कॉल रेकॉर्ड्स; सरकारनं जारी केला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 5:44 PM

Telecom Companies Call Recording : परिपत्रकानुसार, परवानाधारक कंपन्यांना कॉल डेटा रेकॉर्ड, आयपी रेकॉर्ड आणि सर्व व्यावसायिक रेकॉर्ड किमान दोन वर्षांसाठी संग्रहित करावे लागतील.

सरकारने परदेशातून केलेले नॉर्मल कॉल्ससह (International Calls) इंटरनेट कॉल्स, सॅटेलाइट फोन कॉल्स (Satellite Phone Calls), कॉन्फरन्स कॉल्स (Conference Call) आणि मेसेजेस किमान दोन वर्षांसाठी सुरक्षित ठेवणं बंधनकारक केलं आहे. दूरसंचार विभागाने जारी केलेल्या परिपत्रकात दूरसंचार सेवा प्रदात्यांना आंतरराष्ट्रीय कॉल आणि मेसेजेस सुरक्षित ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

डिसेंबरमध्ये युनिफाइड लायसन्समध्ये केलेल्या दुरुस्तीनंतर दूरसंचार विभागाने हे पाऊल उचलले आहे. यामध्ये दोन वर्षांसाठी कॉल डेटा रेकॉर्डशिवाय इंटरनेट तपशील ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापूर्वी ही तरतूद केवळ एका वर्षासाठी लागू होती. युनिफाइड परवानाधारक कंपन्यांमध्ये भारती एअरटेल (Bharti Airtel), रिलायन्स जिओ (Reliance Jio), व्होडाफोन-आयडिया (Vodafone-idea), बीएसएनएल (BSNL) या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्या आपल्या ग्राहकांना सॅटेलाइट फोन सेवा वगळता सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवा प्रदान करतात.

सुरक्षाकारणासाठी निर्णयविभागाने शुक्रवारी जारी केलेल्या या परिपत्रकानुसार, परवानाधारक कंपन्यांना कॉल डेटा रेकॉर्ड, आयपी रेकॉर्ड आणि सर्व व्यावसायिक रेकॉर्ड किमान दोन वर्षांसाठी संग्रहित करावे लागतील, जेणेकरून सरकार सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची पडताळणी करू शकेल. जर सरकारकडून विशिष्ट निर्देश दिले नाहीत, तर दोन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर कंपन्या तो रेकॉर्ड डिलीट करू शकतात. युनिफाइड लायसन्सशी संबंधित तरतुदींमधील बदल टाटा टेलिकम्युनिकेशन्स (Tata Communications), सिस्को वेबेक्स (Cisco Webex), एटी अँड टी (AT&T) अशा ज्यांनी हे परवाने खरेदी केले आहेत,अशा ग्लोबल नेटवर्क्सनदेखील लागू होतील.

टॅग्स :GovernmentसरकारVodafoneव्होडाफोनIdeaआयडियाReliance Jioरिलायन्स जिओAirtelएअरटेल