नवी दिल्ली : सोमवारी लडाखच्या गलवान घाटीमध्ये झालेल्या झटापटीनंतर भारत सरकारने चीनच्या नाड्या आवळायला सुरुवात केली आहे. देशभरात संतापाची लाट असून चीनला कायमचा धडा शिकविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने #BoycottChineseProducts ची मागणी केली आहे. यानुसार टेलिकॉम मंत्रालयाने BSNL, MTNL सह अन्य टेलिकॉम कंपन्यांना चीनकडून साहित्य खरेदी बंद करण्यास सांगितली आहे.
टेलिकॉम मिनिस्ट्रीने सांगितले की, बीएसएनएलच्या 4G अपग्रेडेशनचे जुने टेंडर रद्द करण्यात येणार आहेत. हे टेंडर रद्द झाल्यानंतर चीनच्या कंपन्या पुन्हा टेंडर प्रक्रियमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत. चीनची कंपनी ZTE चा BSNL सर्वात मोठा ग्राहक आहे. सेवा क्षेत्रामध्ये बीएसएनएलला मदत केली जाते. खासगी कंपन्या आधीपासूनच चीनवरील अवलंबित्व कमी करत आहेत. रिलायन्स जिओने ५ जी साठी चीनची कोमतीही मदत घेतली नसल्याचे अंबानी यांनी आधीच स्पष्ट केले होते. तर सध्या ZTE भारती एअरटेलसाठी 2 सर्कल आणि व्होडाफोनसाठी पांच सर्कलमध्ये काम करते. ZTE ही चीनची टेलिकॉम क्षेत्रातील आघाडीची साहित्य निर्माण करणारी कंपनी आहे.
एकट्या टेलिकॉम साहित्याचा बाजार 12 हजार कोटींचा आहे. यामध्ये चीनच्या साहित्याचा वापर 25 टक्के आहे. चीनच्या उत्पादनांवर बंदी आणण्याचा निर्णय महागडा ठरणार असल्याचे या क्षेत्रातील लोकांनी सांगितले. जर भारतीय कंपन्या चीन सोडून दुसऱ्या देशांमधून ही उपकरणे आयात करत असतील तर त्याचा खर्च 15 टक्क्यांनी वाढणार आहे. मंगळवारी CAIT ने केंद्र सरकारकडे चीनी कंपन्यांना दिलेले ठेके तातडीने रद्द करण्याची मागणी केली होती. तसेच भारतीय स्टार्टअप कंपन्यांमध्ये चीनने केलेली गुंतवणूक मागे देण्यासाठी नियम बनविण्याची मागणी केली होती.
चीनची भारतावरील पकडचीनच्या सीमेवर प्रचंड ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा चिनी वस्तूंवर बहिष्कार आणि चीनसोबत व्यापार थांबण्यासाठी आंदोलन तीव्र झाले आहेत. पण कटु सत्य हे आहे की, चीन हा आपल्या देशातील पहिल्या १० व्यापारी भागीदारांपैकी एक आहे. त्याने अनेक क्षेत्रांमध्ये घुसखोरी केली आहे. स्मार्टफोनच्या ६५ टक्के बाजारावर चिनी कंपन्यांचा कब्जा आहे. एवढेच नव्हे तर चिनी कंपन्यांनी भारतातील अनेक मोठ्या आणि लोकप्रिय स्टार्टअपमध्ये कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
India China Face Off: ओप्पोने घेतला 'बायकॉट'चा धसका; Find X2 चे लाईव्ह लाँचिंगच केले रद्द
यंदा मला जिंकवा! डोनाल्ड ट्रम्प यांनी मागितली चीनकडे मदत
Sushant Singh Rajput Suicide: सलमान खान, करण जोहरसह ८ जणांविरोधात न्यायालयात तक्रार दाखल
घरातच काढलेत! हे भन्नाट फोटो पहाल तर चक्कर येऊन पडाल
उंची लहान, पण आत्मविश्वास दांडगा होता; हे लेफ्टनंट ठरणार प्रेरणादायी
India China Face Off: भारतीय गुराख्याचे नाव गलवान घाटी, नदीला; बाप दिलदार दरोडेखोर होता