गेल्या काही दिवसापासून तेलंगणातील बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. अनेक मोठ्या नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे, पण आता बीआरएस पक्षालाच मोठा झटका बसला आहे. तेलंगणातील अनेक बीआरएस नेत्यांनी सोमवारी केसीआर यांना रामराम केला, आणि काँग्रेसशी हातमिळवणी केली. माजी खासदार पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी, तेलंगणाचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव यांच्यासह इतर नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
PM मोदींचा मध्य प्रदेश दौरा अचानक रद्द; मुख्यमंत्री चौहान यांनी सांगितलं कारण
कर्नाटकच्या विजयानंतर काँग्रेस जोरदार तयारी करत आहे, दक्षिणेकडील राज्यांमध्ये त्यांनी प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी तेलंगणातील अनेक नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्ष बदलाच्या या सोहळ्यामुळे सीएम केसीआर यांच्या पक्ष बीआरएसला मोठा झटका बसला आहे. तेलंगणामध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत आणि या निवडणूक वर्षात अनेक BRS नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मिळालेल्या माहितीनुसार, बीआरएसच्या ३५ नेत्यांनी काँग्रेसचे सदस्यत्व घेतले आहे.
सोमवारी माजी खासदार पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी, तेलंगणाचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव यांच्यासह इतर नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी पक्षाशी हातमिळवणी केली. यावेळी काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, पक्षाचे तेलंगण प्रभारी माणिकराव ठाकरे आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रेवंत रेड्डी उपस्थित होते. मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील एआयसीसी कार्यालयात तेलंगणा काँग्रेस नेत्यांचीही भेट घेतली. तेलंगणातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी २ जुलै रोजी तेलंगणाचा दौरा करणार असल्याचे समोर आले आहे.
माजी खासदार पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी आणि तेलंगणा सरकारचे माजी मंत्री जुपल्ली कृष्ण राव यांच्यासह किमान ३५ बीआरएस नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती. त्याअंतर्गत या नेत्यांनी सोमवारी येथे पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेतली. यानंतर जुलैच्या सुरुवातीलाच तेलंगणातील खम्मम येथे जाहीर सभा आयोजित केली जाणार आहे, जिथे हे सर्व नेते औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश घेतील. पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी हे गेल्या लोकसभा निवडणुकीत खम्मममधून बीआरएसचे खासदार होते.
भारत जोडो यात्रेने आणला बदल : पवनखेडा
पवनखेडा म्हणाले की, भारत जोडो यात्रेनंतर परिवर्तनाचे वादळ आले आहे. याचा परिणाम आपण कर्नाटकात पाहिला आहे. पक्ष काँग्रेस आणि सोनिया गांधी यांनी तेलंगणाला दिला. आज अनेक बड्या नेत्यांनी खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. 'देशभर परिवर्तनाचे वारे वाहत आहेत, त्याचा परिणाम कर्नाटकात दिसला आणि इतर राज्यांमध्ये बदलाचे वारे दिसले. आता बीआरएसचे महत्त्वाचे नेते काँग्रेसमध्ये सामील होत आहेत, असंही ते म्हणाले.