श्रीनगर : अनेक निर्बंधांमुळे बंद असलेली काश्मीर खोऱ्यातील टेलिफोन सेवा शनिवारी काही प्रमाणात सुरू झाली असून, जम्मू, कथुआ, सांबा, रियासी या जिल्ह्यांत मोबाइल व २-जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. खो-यातील १७ टेलिफोन एक्स्चेंजमधील फोन सुरू झाले आहेत.खो-यातील शाळा व महाविद्यालये सोमवारी सुरू होतील. खोºयातील बहुसंख्य पेट्रोल पंप बंद असून, पेट्रोल-डिझेल मिळत नसल्याने फारच कमी वाहने रस्त्यांवर दिसत होती. औषधांचा पुरवठा व्यवस्थित सुरू असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.सरकारी कार्यालयांत कर्मचाऱ्यांची उपस्थिती आज चांगली होती. मात्र सर्वत्र सशस्त्र पोलीस तैनात आहेत. ते ये-जा करणाºयांची तपासणी करीत असल्याने महिलांना बाहेर पडण्यास काहीशी भीती वाटत आहे. खोºयात काल निदर्शने व दगडफेक झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे तिथे निर्बंध कायम आहेत. (वृत्तसंस्था)
जम्मूत इंटरनेट तर काश्मीरमध्ये टेलिफोन सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2019 5:12 AM