आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र माजी राज्यमंत्री नारा लोकेश यांना नजर कैदेत ठेवण्यात आले.
दरम्यान, आंध्र प्रदेशात टीडीपीच्या नेत्याची हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या निषेधार्थ आणि राज्यातील वायएसआर काँग्रेस सरकारच्या विरोधात ए. चंद्राबाबू नायडू यांनी आज सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत 'चलो आत्मकूर' आंदोलन करण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर टीडीपीचे कार्यकर्ते ए. चंद्राबाबू नायडू यांच्या घराकडे जात असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
'चलो आत्मकूर' आंदोलनात सहभागी होणाऱ्या कृष्णा जिल्ह्यातील नंदिगामामध्ये डीटीपीचे माजी आमदार तंगिराला सौम्या यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच, विजयवाडा येथून माजी मंत्री आणि डीडीपी नेते भुमा अखिला प्रिया यांना सुद्धा पोलिसांनी नोवोटेल हॉलेटमध्ये नजरकैद केले आहे.
याचबरोबर, टीडीपीचे वरिष्ठ नेते जो अथमाकूर, माजी मंत्री पी पुल्ला राव, नक्का आनंद बाबू, अल्पपति राजा, सिद्ध राघव राव, देवीनेनी उमामहेश्वर राव, आमदार एम. गिरी, जी राममोहन, माजी आमदार बोंडा उमा, वायव्हीबी राजेंद्र प्रसाद आणि देवीनेनी यांनाही पोलिसांनी नजरकैदेत ठेवले आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी परिसरात संचारबंदी लागू केली आहे.