शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

'नागालँडचे लोक माणूस मारुन खातात...' भाजप नेत्याचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 5:31 PM

नागालँडचे मंत्री टेमजेन इमना अलाँग सध्या चर्चेत आहेत. त्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

नवी दिल्ली: नागालँड सरकारमधील उच्च शिक्षण तथा आदिवासी व्यवहार मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष मंत्री तेमजेन इमना अलाँग  (Temjen Imna Along) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये ते 1999 मध्ये दिल्लीला आल्याचा एक मजेशीर आणि तेवढाच विचार करायला लावणारा एक किस्सा सांगत आहेत. नागालँडमधील विविध खाद्यपदार्थ, जुन्या दिल्ली स्टेशनवर येण्याचा अनुभव आणि इतर अनेक गोष्टींवर ते या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत.

भाजप नेते टेमजेन इमना अलाँग या व्हिडिओमध्ये सांगतात की, भारतातील लोकांमध्ये नागालँडबद्दल अनेक गैरसमज आहेत. उदाहरणार्थ, नागालँडचे लोक माणूस मारुन खातात. तेमजेन इमना अलाँग यांनी 13 जुलै रोजी ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये टेमजेन सांगतात की, 'मी जेव्हा 1999 मध्ये पहिल्यांदा दिल्लीला आलो, जेव्हा आम्ही जुन्या दिल्ली रेल्वे स्टेशनवर उतरलो होतो. तेव्हा आम्हाला आमच्या नागालँड राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या इथे दिसली.'

'इतकी लोकं पाहून आम्ही आश्चर्यचकीत झालो. तेव्हा लोक म्हणायचे नागालँड कुठे आहे? तिथे जाण्यासाठी व्हिसाची गरज आहे का? नागा लोक माणसाला खातात का? नागालँडबद्दल चुकीची माहिती पसरवली जायची. आम्ही दिसायला वेगळे आहोत, आमचे खाण्याचे पदार्थ वेगळे आहेत, विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. 50 वर्षांपासून त्याच पद्धतीने राहत आलो आहोत.' त्यांचा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो लोकांनी रिट्विट केला आहे. तसेच, अनेकांना त्यांचा हा व्हिडिओ आणि प्रामाणिकपणा आवडत आहे.

ताजमहालात पोहोचल्यावर परदेशी समजलेटेमजेनचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात त्यांनी त्यांच्या आग्रा सहलीबद्दलचा अनुभव शेअर केला होता. 'आजतक'ने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितले की, 1999 मध्ये आग्रा येथे ताजमहाल पाहण्यासाठी ते काउंटरवर पोहोचला तेव्हा लोकांनी त्यांना परदेशी समजले आणि तिकीटाचे 20 डॉलर्स मागितले. यानंतर त्यांना सांगावे लागले की, ते भारतीय असून नागालँडचे रहिवासी आहेत. 

लहान डोळ्यांचे अनेक फायदे टेमगेन यांच्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी लहान डोळ्यांचे फायदे सांगितले. 'डोळे लहान असल्यामुळे डोळ्यात घाण कमी जाते. स्टेजवर कार्यक्रम सुरू असताना झोपही घेता येते,' असे म्हणताच कार्यक्रमातील अनेकजण हसू लागतात.

टॅग्स :BJPभाजपाnagaland-pcनागालँड