त्रियुगनारायण तिवारी ।लोकमत न्यूज नेटवर्कअयोध्या : भव्य राममंदिर उभारण्यासाठी येत्या ५ आॅगस्ट रोजी आयोजित भूमिपूजन समारंभाची तयारी मोठ्या जोमाने करण्यात येत असून, भूमिपूजन सोहळा दिवाळीसारखाच भव्य दिव्य साजरा करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांचे भाषण जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी अयोध्या महापालिका परिसरात ध्वनिक्षेपक लावण्यात येणार असून, त्याद्वारे मंत्रोच्चाराचे प्रसारण केले जाणार असून, २० ठिकाणी एलईडीवरून हा सोहळा दाखविला जाणार आहे. अयोध्येतील पंतप्रधानांच्या संंपूर्ण कार्यक्रमाचे दूरदर्शनवरूनही थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस चंपत राय यांनी निवेदन जारी करून भाविकांना अयोध्येला न येता घरी बसून हा भव्य सोहळा पाहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाची साथ आटोक्यात आल्यानंतर जनतेला राममंदिराचे दर्शन घेता येईल.पंतप्रधान मोदी यांच्या आगमनावेळी संपूर्ण अयोध्यानगरी पताकांनी सजविली जाणार असून, प्रमुख मंदिरांवर रोषणाई केली जाणार आहे. पंतप्रधान ज्या रस्त्याने येणार आहेत, तो रस्ता फुलांनी सुशोभित केला जाणार आहे.रामजन्मभूमी परिसरात एक लाख दिवे लावले जातील. पंतप्रधान मोदी रामलल्लांचे दर्शन घेऊन वृक्षारोपण करतील, तसेच विविध योजनांचे लोकार्पण आणि पायाभरणीही करतील.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त कार्यालयाचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांच्या माहितीनुसार ८ राज्यांतून ५१ ठिकाणांहून माती आणि जल भूमिपूजनासाठी पोहोचले आहे. अयोध्येतील प्रत्येक घर दिव्यांनी उजळविण्यासाठी महापालिका २१-२१ दिवस तेल आणि वाती पुरविण्याची व्यवस्था करीत आहे. सर्व परिसर आकर्षक रांगोळीने सुशोभित केला जाणार असून, अयोध्येत मुख्य रस्त्यावरील घरे आणि दुकानांना पिवळ्या रंग दिला जात आहे.रतन टाटा, मुकेश अंबानींसहउद्योगजगतातील मान्यवर निमंत्रितच्नवी दिल्ली : अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी येत्या ५ आॅगस्ट रोजी भूमिपूजन समारंभाचे आयोजन करण्यात आले असून, या ऐतिहासिक समारंभात कोण-कोण सामील होणार आहेत, याविषयी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.च्सूत्रांनुसार जवळपास दोनशेहून अधिक मान्यवर व्यक्तींना निमंत्रित केले जाणार आहे. अतिथींच्या यादीत उद्योगजगतातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले असून, यात उद्योगपती रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदाणी, कुमार मंगलम बिर्ला, आनंद महिंद्रा, राहुल आणि राजीव बजाज यांच्यासह उद्योगजगतातील दहा मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे.च्पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. अयोध्येतील या ऐतिहासिक कार्यक्रमाचा तपशीलही जारी करण्यात आला आहे. राममंदिर भूमिपूजन कार्यक्रमासाठी देशभरातील पन्नास मान्यवर व्यक्तींनाही निमंत्रण पाठविण्यात आले आहे.
देणग्यांचा वाढताओघराममंदिर भूमिपूजन समारंभासाठी आता केवळ आठ दिवस बाकी असताना अयोध्येत श्री रामाचे भव्य मंदिर उभारण्यासाठी देणग्यांचा ओघ वाढत आहे. विश्व हिंदू परिषद देशभरातील10कोटी कुटुंबियांकडून देणग्या गोळा करण्यासाठी मोहीम सुरू करणार आहे. ५ आॅगस्ट रोजी राम जन्मभूमी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोनशिला रचल्यानंतर मंदिराच्या बांधकामास सुरुवात होईल.प्रख्यात आध्यात्मिक गुरू आणि कथावाचक मोरारी बापू यांनी आपल्या चित्रकूटस्थित आश्रमातर्फे व्यासपीठाकडून श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त मंडळाला अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी05कोटी रुपयांची देणगी घोषित केली आहे, तसेच त्यांनी भाविकांनाही योगदान देण्याचे आवाहन केले आहे.
निमंत्रितांच्या यादीवर मंथन
कोविड-१९ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार एका ठिकाणी पन्नासहून अधिक लोक एकत्र जमू शकत नाहीत. अशात भूमिपूूजन समारंभासाठी मार्गदर्शक सूचनांत बदल करून संख्या वाढविली जाण्याची शक्यता आहे. संख्या न वाढविल्यास अतिथींची संख्या10 प्रमुख अयोध्येतील मठांच्या महंतांची नावे यादीत आहेत. यात दिगंबर आखाडाचे सुरेश दास, सुग्रीव किलाचे प्रश्न आचार्य, दशरथ महलचे बिंदू गद्दी आचार्य, राम वल्लभा कुंजचे राजकुमार दास, गोलाघाटचे सिया किशोरी शरण, अशर्फी भवनचे श्री धराचार्य जी, कौशलेश सदनचे विद्या भास्कर, मणिराम दास छावणीचे उत्तराधिकारी कमलनयन दास आणि बडा भक्तमालचे अवधेश दास यांची प्रामुख्याने नावे आहेत. अयोध्येचे खासदार लल्लू सिंह, आमदार वेदप्रकाश गुप्ता, महापौर ऋषिकेश उपाध्याय, माजी खासदार विनय कटियार यांची नावेही चर्चेत आहेत. अयोध्या महापालिकेतील विरोधी पक्षाच्या पाच वरिष्ठ नेत्यांना निमंत्रित करण्याचा विचार आहे.