"हा पिकनिक स्पॉट नाही...", मंदिरांमध्ये बिगर हिंदूंना प्रवेश बंदी, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 09:55 AM2024-01-31T09:55:39+5:302024-01-31T10:19:51+5:30

हिंदूंनाही त्यांचा धर्म मानण्याचा आणि पाळण्याचा अधिकार आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

temple is not tourist picnic spot non believing non hindus cant enter said madras high court tamilnadu | "हा पिकनिक स्पॉट नाही...", मंदिरांमध्ये बिगर हिंदूंना प्रवेश बंदी, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

"हा पिकनिक स्पॉट नाही...", मंदिरांमध्ये बिगर हिंदूंना प्रवेश बंदी, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

मदुराई :  सर्व हिंदू मंदिरांमध्ये 'कोडीमाराम' (ध्वजस्तंभ)  क्षेत्राच्यापुढे हिंदू नसलेल्यांना परवानगी नाही, असे फलक लावण्याचे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी तामिळनाडू सरकारच्या हिंदू धर्म आणि धर्मादाय यंत्रणा विभागाला दिले आहे. तसेच, हिंदूंनाही त्यांचा धर्म मानण्याचा आणि पाळण्याचा अधिकार आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाचे न्यायमूर्ती एस श्रीमती यांनी डी. सेंथिल कुमार यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला. डी. सेंथिल कुमार यांनी फक्त हिंदूंना अरुल्मिगु पलानी धनदायुथापानी स्वामी मंदिर आणि त्यांच्या उपमंदिरांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यासाठी याचिका दाखल केली होती. तसेच, सर्व मंदिरांच्या प्रवेशद्वारांवर याबाबतचे फलक लावण्याच्या सूचनाही विनंती केली होती.

याप्रकरणी मंगळवारी मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी मंदिराच्या प्रवेशद्वारावर, ध्वजस्तंभाजवळ आणि मंदिरातील प्रमुख ठिकाणी फलक लावण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारच्या हिंदू धर्म आणि धर्मादाय यंत्रणा विभागाला आदेश दिले. तसेच, हिंदूंनाच हिंदू मंदिरात प्रवेश द्यावा, मंदिर पिकनिक स्पॉट नाही, हिंदू नसलेल्यांना प्रवेश देऊ नये, जर एखाद्या गैर हिंदू व्यक्तीने मंदिराला भेट दिली तर अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीकडून प्रतिज्ञापत्र घ्यावे लागेल की, त्याची देवतेवर श्रद्धा आहे आणि तो हिंदू धर्माच्या चालीरीती व प्रथा पाळेल आणि नियम व नियमांचे पालन करेल, असे उच्च न्यायालयाने सांगितले.

याचिकाकर्त्याचे म्हणणे काय होते?
पलानी मंदिराच्या बोर्डवरील सदस्य सेंथिल कुमार यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी म्हटले होते की,"प्रसिद्ध पलानी मुरुगन मंदिरात रोज हजारो लोक येतात. यामध्ये गैर हिंदूंची संख्या मोठी असते. त्यांच्या वागणुकीमुळे हिंदू धार्मिक भाविकांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात यावे." दरम्यान,  भगवान मुरुगन मंदिर दिंडीगुल जिल्ह्यातील पलानी येथे आहे.

Web Title: temple is not tourist picnic spot non believing non hindus cant enter said madras high court tamilnadu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.