शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

"हा पिकनिक स्पॉट नाही...", मंदिरांमध्ये बिगर हिंदूंना प्रवेश बंदी, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 9:55 AM

हिंदूंनाही त्यांचा धर्म मानण्याचा आणि पाळण्याचा अधिकार आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

मदुराई :  सर्व हिंदू मंदिरांमध्ये 'कोडीमाराम' (ध्वजस्तंभ)  क्षेत्राच्यापुढे हिंदू नसलेल्यांना परवानगी नाही, असे फलक लावण्याचे निर्देश मद्रास उच्च न्यायालयाने मंगळवारी तामिळनाडू सरकारच्या हिंदू धर्म आणि धर्मादाय यंत्रणा विभागाला दिले आहे. तसेच, हिंदूंनाही त्यांचा धर्म मानण्याचा आणि पाळण्याचा अधिकार आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाचे न्यायमूर्ती एस श्रीमती यांनी डी. सेंथिल कुमार यांच्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय दिला. डी. सेंथिल कुमार यांनी फक्त हिंदूंना अरुल्मिगु पलानी धनदायुथापानी स्वामी मंदिर आणि त्यांच्या उपमंदिरांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देण्यासाठी याचिका दाखल केली होती. तसेच, सर्व मंदिरांच्या प्रवेशद्वारांवर याबाबतचे फलक लावण्याच्या सूचनाही विनंती केली होती.

याप्रकरणी मंगळवारी मद्रास उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी मंदिराच्या प्रवेशद्वारावर, ध्वजस्तंभाजवळ आणि मंदिरातील प्रमुख ठिकाणी फलक लावण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारच्या हिंदू धर्म आणि धर्मादाय यंत्रणा विभागाला आदेश दिले. तसेच, हिंदूंनाच हिंदू मंदिरात प्रवेश द्यावा, मंदिर पिकनिक स्पॉट नाही, हिंदू नसलेल्यांना प्रवेश देऊ नये, जर एखाद्या गैर हिंदू व्यक्तीने मंदिराला भेट दिली तर अधिकाऱ्यांना त्या व्यक्तीकडून प्रतिज्ञापत्र घ्यावे लागेल की, त्याची देवतेवर श्रद्धा आहे आणि तो हिंदू धर्माच्या चालीरीती व प्रथा पाळेल आणि नियम व नियमांचे पालन करेल, असे उच्च न्यायालयाने सांगितले.

याचिकाकर्त्याचे म्हणणे काय होते?पलानी मंदिराच्या बोर्डवरील सदस्य सेंथिल कुमार यांनी मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी म्हटले होते की,"प्रसिद्ध पलानी मुरुगन मंदिरात रोज हजारो लोक येतात. यामध्ये गैर हिंदूंची संख्या मोठी असते. त्यांच्या वागणुकीमुळे हिंदू धार्मिक भाविकांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखण्यात यावे." दरम्यान,  भगवान मुरुगन मंदिर दिंडीगुल जिल्ह्यातील पलानी येथे आहे.

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूHigh Courtउच्च न्यायालयTempleमंदिर