‘नीट’चे ते निकष स्थगित, दिल्ली उच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:41 AM2018-03-01T01:41:14+5:302018-03-01T01:41:14+5:30
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेतल्या जाणाºया ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’च्या (नीट) पात्रता निकषांना दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली.
नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेतल्या जाणाºया ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’च्या (नीट) पात्रता निकषांना दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली.
परीक्षेसाठी अर्ज ९ मार्चपर्यंत भरता येतील. काही विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकांवर न्या. संजीव खन्ना व न्या. चंदर शेखर यांच्या खंडपीठाने ही स्थगिती दिली. या अंतरिम आदेशामुळे परीक्षार्थींना अर्ज भरता येणार असले तरी त्यांना परिक्षेला बसता येईलच असे नाही. तसेच ओपन स्कूलमध्ये शिकलेले किंवा बाहेरून इयत्ता १२ वीची परीक्षा दिलेले विद्यार्थी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाचे असतील तरच त्यांना अर्ज भरता येईल. न्यायालयाने पुढील सुनावणी ६ मार्च रोजी ठेवली. ‘सीबीएसई’चे म्हणणे तेव्हा ऐकले जाईल. पात्रता निकषांनुसार खुल्या व राखीव प्रवर्गासाठी अनुक्रमे २५ व ३० वर्षांची कमाल वयोमर्यादा ठरली आहे. ओपन स्कूलमध्ये शिकलेले, १२ वीची परीक्षा बाहेरून दिलेले, जीवशास्त्र हा अतिरिक्त विषय घेतलेले आणि ११ व १२ वी साठी दोन वर्षांहून अधिक वेळ घेतलेले ‘नीट’ साठी अपात्र ठरविण्यात आले आहेत.