शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

‘नीट’चे ते निकष स्थगित, दिल्ली उच्च न्यायालयाची तात्पुरती स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 1:41 AM

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेतल्या जाणाºया ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’च्या (नीट) पात्रता निकषांना दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली.

नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेतल्या जाणाºया ‘नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट’च्या (नीट) पात्रता निकषांना दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरती स्थगिती दिली.परीक्षेसाठी अर्ज ९ मार्चपर्यंत भरता येतील. काही विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिकांवर न्या. संजीव खन्ना व न्या. चंदर शेखर यांच्या खंडपीठाने ही स्थगिती दिली. या अंतरिम आदेशामुळे परीक्षार्थींना अर्ज भरता येणार असले तरी त्यांना परिक्षेला बसता येईलच असे नाही. तसेच ओपन स्कूलमध्ये शिकलेले किंवा बाहेरून इयत्ता १२ वीची परीक्षा दिलेले विद्यार्थी मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाचे असतील तरच त्यांना अर्ज भरता येईल. न्यायालयाने पुढील सुनावणी ६ मार्च रोजी ठेवली. ‘सीबीएसई’चे म्हणणे तेव्हा ऐकले जाईल. पात्रता निकषांनुसार खुल्या व राखीव प्रवर्गासाठी अनुक्रमे २५ व ३० वर्षांची कमाल वयोमर्यादा ठरली आहे. ओपन स्कूलमध्ये शिकलेले, १२ वीची परीक्षा बाहेरून दिलेले, जीवशास्त्र हा अतिरिक्त विषय घेतलेले आणि ११ व १२ वी साठी दोन वर्षांहून अधिक वेळ घेतलेले ‘नीट’ साठी अपात्र ठरविण्यात आले आहेत.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयStudentविद्यार्थीexamपरीक्षा