नवी दिल्ली : भारतातील दहा प्रमुख शैक्षणिक संस्थांच्या वेबसाइटस् हॅक करून त्यावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’ ही घोषणा टाकल्याने खळबळ उडाली आहे. दिल्ली विद्यापीठ, अलिगढ मुस्लीम विद्यापीठ, आयआयटी-दिल्ली आणि आयआयटी-बीएचयू या संस्थांसह दहा वेबसाइट्सवर हल्ला चढविणाऱ्याने आपण पाकिस्तान हॅक्झॉर क्रू असल्याचे म्हटले आहे.कोटा विद्यापीठ, आर्मी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट अँड टेक्नॉलॉजी, डिफेन्स इन्स्टिट्यूट आॅफ अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी, आर्मी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्ट आणि नॅशनल एरोस्पेस लॅब्रोटोरीज अँड बोर्ड आॅफ रिसर्च इन न्युक्लिअर सायन्सेस यांच्या वेबसाईटस्चाही त्यात समावेश आहे. काश्मीरचा राग आवळलाया वेबसाइट्सवर टाकण्यात आलेल्या दोन व्हिडीओंसोबत ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी ओळ आहे. यात काश्मिरात निर्दयीपणे अत्याचार करणाऱ्या भारतीय लष्कराविरुद्ध काश्मिरी लोक निदर्शने करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. दिल्ली विद्यापीठाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही या प्रकरणाची दखल घेतली असून, वेबसाइट लवकरच ठीक केली जाईल.विद्यापीठे झाली सतर्क : अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या प्रवक्त्याने सांगितले की, हा प्रकार आमच्याही निदर्शनास आला असून, विद्यापीठाचा आयटी विभाग हा प्रकार रोखण्यासाठी आवश्यक ते उपाय करीत आहे. तथापि, आयआयटी-दिल्ली आणि आयआयटी-बीएचयूची यावर कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.भारतीयांना इशारावेबसाइट्सवर टाकण्यात आलेल्या संंदेशात हॅकर्सनी असे म्हटले आहे की, भारत सरकार आणि भारतीय जनतेला अभिवादन! तुमचे तथाकथित जवान काश्मिरात काय करतात, हे तुम्हाला माहीत आहे का? काश्मिरात अनेक निरपराध लोक मारले जात आहेत, हे ठाऊक आहे का? त्यांनी अनेक मुलींवर बलात्कार केला आहे. ते आजही काश्मीरमधील मुलींवर कुकर्म करीत आहेत? हे माहीत आहे का? तुमचे भाऊ, बहीण, आई-वडिलांना ठार मारले, तर काय वाटेल? तुमच्या आई-बहिणीवर बलात्कार केल्यास काय वाटेल? तुमचे कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही का?
दहा शैक्षणिक संस्थांच्या वेबसाइट हॅक
By admin | Published: April 26, 2017 2:12 AM