अहमदाबाद : पाकिस्तानच्या घुसखोरांनी ड्रग्ज आणि शस्त्रे घेऊन सागरी सीमेवरून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. गुजरातमधील ओखा येथून ते देशाच्या सीमेत प्रवेश करत होते, मात्र कोस्टगार्ड आणि गुजरात एटीएसने त्याचा मनसुबा उधळून लावला. कोस्टगार्ड आणि एटीएसने 300 कोटी रुपयांच्या ड्रग्ज आणि शस्त्रांसह आरोपींना पकडले. सागरी सीमेवर शस्त्रसाठा जप्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. एटीएसने ड्रग्ज आणि शस्त्रांसह 10 पाकिस्तानींना अटक केली आहे.
आरोपींकडून 6 पिस्तूल आणि 120 राऊंड जप्त करण्यात आले आहेत. एटीएस गुजरातच्या सहकार्याने ही कारवाई करण्यात आल्याचे कोस्टगार्डने सांगितले. अल सोहेली हा पाकिस्तानी मासेमारी बोटीतून दहा क्रू मेंबर्ससह भारतीय हद्दीत घुसखोरी करत होता. त्यांच्याकडून शस्त्रे आणि 40 किलो ड्रग्ज सापडल्याचे कोस्टगार्डने सांगितले. तसेच, या ड्रग्सची बाजारातील किंमत 300 कोटी रुपये आहे. दरम्यान, कारवाईनंतर ही बोट ओखा येथे आणण्यात आली.
पंजाबमध्ये ड्रोनद्वारे तस्करीविशेष म्हणजे पाकिस्तान कोणत्या ना कोणत्या मार्गाने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतो. काही दिवसांपूर्वी बीएसएफने पंजाबमध्ये घुसलेले पाकिस्तानी ड्रोन पाडले होते. या ड्रोनद्वारे ड्रग्सचा पुरवठाही केला जात होता. ड्रोन पाकिस्तानच्या हद्दीत पडले, त्यामुळे तेथील रेंजर्सनी ते नेले. अमृतसरमधील डाओके बॉर्डर चौकीजवळ ही घटना घडली होती. बीएसएफने सांगितले की, सैन्याने परिसरात शोध घेतला, तेव्हा भरोपाल गावात सीमेजवळ 4.3 किलो संशयित हेरॉईन असलेले एक पॅकेट सापडले होते.
25 किलो हेरॉइन जप्त ड्रोनमधून ड्रोन पॅकेट टाकल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ड्रोनविरोधी कारवाई केल्यानंतर ते (ड्रोन) काही मिनिटे आकाशात उडले आणि नंतर परतताना जमिनीवर पडले. पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरही ड्रग्ज जप्त केल्याची घटना समोर आली आहे. मात्र, या घटनेचा ड्रोनमधून खाली पडण्याशी संबंध नाही. त्यांनी सांगितले की बीएसएफने गेल्या मंगळवारी पहाटे 2 च्या सुमारास फाजिल्का जिल्ह्यातील एका शेतातून 25 किलो संशयित हेरॉइन जप्त केले.