शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
3
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
4
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
5
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
6
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
7
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
8
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
9
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
10
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
11
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
12
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
13
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
14
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता
15
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
16
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
17
...यासाठी बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना माफ करणार नाहीत; संजय राऊत भडकले
18
आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार!
19
शुक्राचा गुरु राशीत प्रवेश: १० राशींवर धनलक्ष्मी कृपा, अचानक धनलाभाचे योग; शुभ-लाभाचा काळ!
20
Devayani Farande : मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा

PUBG खेळणं पडलं महागात, 10 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 10:47 AM

परीक्षेच्या काळात पबजी खेळण्यावर गुजरात सरकारने बंदी घातली आहे. गुजरातमध्ये मोबाईलवर पबजी खेळून सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 10 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.  

ठळक मुद्देगुजरात सरकारने परीक्षेच्या काळात पबजी खेळण्यावर बंदी घातली आहे.मोबाईलवर पबजी खेळून सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 10 जणांना गुजरातमध्ये पोलिसांनी अटक केली.राजकोट पोलिसांनी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

राजकोट -  पोकेमॉन गो, ब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर PUBG या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. पबजी खेळणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. राजकोटमध्ये पबजी खेळणं काही लोकांना महागात पडलं आहे. गुजरात सरकारने परीक्षेच्या काळात पबजी खेळण्यावर बंदी घातली आहे. मोबाईलवर पबजी खेळून सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 10 जणांना गुजरातमध्येपोलिसांनीअटक केली आहे.  

गुजरातमधील सूरत आणि राजकोटमध्ये पबजी खेळण्यावर बंदी आहे. यासंबंधीचे परीपत्रक पोलिसांनी सोशल मीडियावरून जारी केले होते. पबजीवर परिक्षेच्या काळात म्हणजेच 9 मार्चपासून बंदी घालण्यात आली असून 30 एप्रिलपर्यंत ही बंदी राहणार आहे. राजकोट पोलिसांनी या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आत्तापर्यंत 10 जणांना अटक केली आहे.

'PUBG' च्या वेडापायी मुलाने वडिलांच्या अकाऊंटमधून 50,000 चोरले

पंजाबमधील एका मुलाने 'पबजी' च्या वेडापायी वडिलांच्या बँक अकाउंटमधून पेटीएमच्या साहाय्याने तब्बल 50,000 रुपये चोरल्याची घटना समोर आली होती. दोन दिवसांपूर्वी जालंधरमध्ये ही घटना घडली. पबजी खेळण्यासाठी त्यासंबंधीत काही सामान आणण्यासाठी पैसे चोरल्याची माहिती मिळली होती. मुलाच्या वडिलांनी बँक अकाउंटमधून 50,000 रुपये वजा झाल्यामुळे यासंबंधी पोलिसांत तक्रार दाखल केली. मात्र नंतर आपल्याच मुलाने पैसे चोरल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वडिलांनी पोलिसांत केलेली तक्रार मागे घेतली. 

PUBG वर बंदी आणा, 11 वर्षांच्या विद्यार्थ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र

'PUBG' या ऑनलाईन गेमवर बंदी घालण्याची मागणी एका चिमुकल्याने काही दिवसांपूर्वी केली होती.  मुंबईतील 11 वर्षांच्या विद्यार्थ्याने PUBG वर बंदी आणा असं सांगणार एक पत्र केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना लिहिलं होतं. अहद असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने राज्य सरकारला चार पानांचं पत्र लिहिलं. PUBG मुळे मुलांच्या मनावर वाईट परिणाम होत आहेत. तसेच मुलं हिंसक होत असल्याचं सांगत अहदने या गेमवर बंदी आणण्याची मागणी केली होती. अहदची आई मरियम नियाझ या वकील आहेत. 'सरकारने पत्राची दखल घेतली नाही तर आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू. हा खेळ तरुणांसाठी घातकच आहे,' असे त्यांनी म्हटले होते. 

'तो' सलग 10 दिवस PUBG खेळला, अन्...

सध्या जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. काही दिवसांपूर्वी पबजी खेळण्याची सवय जम्मू-काश्मीरमधील अशाच एका तरुणाला महागात पडली होती. सलग 10 दिवस पबजी खेळल्याने तरुणाचं मानसिक संतुलन बिघडल्याची माहिती समोर आली होती.  

पोकोमॉन, ल्युडो किंग व ब्लू व्हेल या गेमनंतर पबजी हा गेम इंटरनेटवरील सध्याचा बेस्ट अ‍ॅक्शन गेम आहे. हा गेम मोबाइल, टॅब, लॅपटॉपवर खेळता येतो. दक्षिण कोरियन व्हिडिओ गेम कंपनीने ब्लू होल सहायक अंतर्गत हा गेम बनवला आहे. या गेममध्ये कमीत कमी 1 ते 4 सदस्य सहभागी होऊ शकतात. त्यांच्या बरोबरीने हा गेम समूहाने खेळला जातो. या गेममध्ये गेम खेळणारा सैनिकाची भूमिका बजावत, वेगवेगळ्या क्षेत्रांत घुसून विरोधी पक्षाला बंदुकीने मारायचे काम करतो. त्यांचे साहित्य हस्तगत करतो. या गेममध्ये वेगवेगळ्या ठिकाणांवरून गेम खेळणारे खेळाडू एकमेकांशी लाइव्ह संवाद साधतात आणि एकमेकांना मार्गदर्शन करतात. या गेमवर आकर्षक बक्षिसे असल्यामुळे या गेमकडे लोकांचे आकर्षण वाढत आहे.

टॅग्स :PUBG Gameपबजी गेमGujaratगुजरातPoliceपोलिसArrestअटक