गुप्तचरांचा इशारा : घातपाताची शक्यतानवी दिल्ली/जयपूर : पाकिस्तानातून दहा दहशतवादी भारतात घुसले असून, प्रजासत्ताकदिनी राजधानी नवी दिल्लीत ते घातपात घडविण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर खात्याने दिला आहे. या दहा दहशतवाद्यांपैकी तीन जण नेपाळमार्गे भारतात आले आहेत. सध्या ते फरिदाबाद भागात आहेत. त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा असून तो लपविण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. गाझियाबादच्या वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नेपाळ सीमेवरून काही दहशतवाद्यांनी फरिदाबाद व गाझियाबाद शहरात प्रवेश केल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आम्ही शोधमोहीम सुरू केली असून, २०० अधिकारी शहराचे कानेकोपरे तपासत आहेत, असे त्यांनी सांगितले. च्राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातील प्रसिद्ध खातुश्यामजी मंदिर परिसरात सापडलेल्या एका निनावी धमकी पत्रामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. यात दहशतवादी हल्ला घडविण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या पार्श्वभूमीवर जयपूर, सिकर येथील सुरक्षा बंदोबस्त वाढविला आहे.च्हे हस्तलिखित पत्र मंदिर परिसरात पडलेले होते. मंदिराच्या एका पदाधिकाऱ्याला ते सापडले. झेरॉक्स कॉपी असलेल्या या पत्रात हल्ला नेमका कुठे होणार याचा उल्लेख नाही. कुणीतरी गंमत म्हणून हे पत्र मंदिर परिसरात ठेवल्याचे स्पष्ट होते. परंतु तरीही खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्त वाढविला आहे.
भारतात घुसले दहा दहशतवादी
By admin | Published: January 01, 2015 3:23 AM