शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

भाडेकरू घरमालकाविरुद्ध प्रतिकूल ताब्याचा दावा करू शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 1:17 PM

पाच दशकांपूर्वीचा खटला निघाला निकाली; १९७५ मध्ये दाखल झाला हाेता दावा 

नवी दिल्ली : भाडेकरू त्यांच्या घरमालकांविरुद्ध प्रतिकूल ताब्याचा दावा करू शकत नाहीत, कारण त्यांचा ताबा मूलत: परवानगीवर आधारित आहे, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि राजेश बिंदल यांचा समावेश असलेले खंडपीठ अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर निर्णय देत होते. अलाहाबाद उच्च न्यायालयाने मालकी/ताब्याचा दावा करणारी वेळ-प्रतिबंधित याचिका फेटाळली होती. वादीने १९६६ मध्ये अमलात आणलेल्या नोंदणीकृत विक्री कराराद्वारे (सेल डीड) हक्क सांगितला आणि विक्री करारानुसार घरावर ताबा मिळाल्याचा दावा केला होता. १९७५ मध्ये प्रतिवादींनी बांधकामात अडथळा आणल्याने फिर्यादीने दावा दाखल केला होता.

- कनिष्ठ न्यायालयाने खटला निकाली काढला आणि त्यापेक्षा कनिष्ठ न्यायालयाने अपीलास दुजोरा दिला असला तरी, हायकोर्टाने हा खटला वेळ-प्रतिबंधित केला, कारण प्रतिवादींनी १९४४ मध्ये फिर्यादीच्या पूर्ववर्तींच्या हितसंबंधांवर प्रतिकूल कब्जा मिळवला होता. - हा निष्कर्ष चुकीचा असल्याचे नमूद करून, सर्वोच्च न्यायालयाने प्रतिवादी हे भाडेकरू होते आणि त्यामुळे त्यांचा ताबा परवानगीवर आधारित होता. त्यांनी १९४४ पासून कोणत्याही प्रतिकूल ताब्याचा दावा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे म्हटले आहे.- न्यायालय पुढे म्हणाले, "आमच्या विचारात, वादी अपीलकर्त्यांना २१.१.१९६६ रोजी नोंदणीकृत विक्री करारांतर्गत त्यांची मालकी मिळाली. प्रतिवादी विरुद्ध ताब्यासाठीचा वाद केवळ त्या तारखेनंतरच उद्भवला. - मान्य आहे की, विक्री कराराच्या तारखेपासून, १२ वर्षांच्या कालावधीनंतर मे, १९७५ मध्ये दावा दाखल करण्यात आला होता. 

जरी असे गृहीत धरले की प्रतिवादी १९४४ पूर्वीपासून ताब्यात होते, तरीही ते प्रतिकूल ताब्यासाठी दावा करू शकत नाही, कारण त्यांचा ताबा मूलत: परवानगीवर आधारित आहे. प्रतिकूल ताब्यासाठी १९६६ पूर्वी कोणतीही कार्यवाही झाली नव्हती. 

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय