४४ वाळू गटांसाठी निविदा प्रसिद्ध १९ रोजी निविदा उघडणार : जिल्हाभरातून मागविले प्रस्ताव
By admin | Published: December 03, 2015 12:36 AM
जळगाव : जिल्ातील गिरणा, तापी, पांझरा, बोरी व बहुळा या नदीपात्रातील वाळू गटांच्या लिलावाची ऑन लाईन प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्यानुसार बुधवार २ रोजी ४४ वाळू गटांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जळगाव : जिल्ातील गिरणा, तापी, पांझरा, बोरी व बहुळा या नदीपात्रातील वाळू गटांच्या लिलावाची ऑन लाईन प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. त्यानुसार बुधवार २ रोजी ४४ वाळू गटांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.१९ रोजी निविदा उघडणारजिल्हा प्रशासनाने वाळू गटांची ऑन लाईन लिलावाची प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून २ रोजी ४४ वाळू गटांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात वाळू स्थळाचे नाव, नदीचे नाव, वाळू साठ्यालगतचे गट क्रमांक, उपलब्ध होऊ शकणारा वाळू साठा, तसेच लिलावासाठी प्रस्तावित अपसेट प्राईज याबाबत माहिती देण्यात आली आहे. ३ ते १७ डिसेंबर दरम्यान निविदा मागविण्यात येणार आहे. १९ रोजी आलेल्या निविदा उघडण्यात येणार आहे.या वाळू गटांचे होणार लिलावअमळनेर तालुका- मांडळ भाग १, पांझरा नदी, मांडळ भाग-२, पांझरा, मुडी प्र.डां., पांझरा, बोदर्डे, पांझरा. चोपडा तालुका- धुपे खुर्द. तापी, घाडवेल, तापी, वाळकी शेंदणी, मालखेडा, खाचणे, तांदलवाडी भाग-१ , पिंप्री. रावेर तालुका- दोेधे, मुक्ताईनगर तालुका- पातोंडी, तापी, पिंप्रीनांदू , भोकरी. जळगाव तालुका- जामोद, गिरणा, कुवारखेडे, गिरणा, नागझीरी, गिरणा, धानोरा बु.२, गिरणा. एरंडोल तालुका- उत्राण गु.ह. भाग- ४, गिरणा, हनुमंतखेडेसीम भाग १, गिरणा, धरणगाव तालुका - बांभोरी प्र.चा. भाग-१, गिरणा, प्र.चा.भाग १ कवठळ, गिरणा, चांदसर बु., गिरणा, चोरगाव, गिरणा, रेल, गिरणा, बाभुळगाव, गिरणा, पारोळा तालुका- टोळी तामसवाडी, बोरी नदी. पाचोरा तालुका- दुसखेडा, बहुळा, परधाडे, गिरणा, माहिजी, गिरणा, कुरंगी भाग-१, गिरणा, वरसाडे प्र.बो., गिरणा, भडगाव तालुका- पिंपळगाव बु., गिरणा, कराब-वडघे, गिरणा, वडजी भाग २, गिरणा, टोणगाव गिरणा, सावदे, गिरणा, पांढरद, गिरणा, पिचर्डे, गिरणा, वाडे, गिरणा, दलवाडे, गिरणा, कोठली, गिरणा. या वाळूगटांचा समावेश आहे.