नवी दिल्ली - भाजप आणि काँग्रेस हे देशातील दोन सर्वात मोठे राष्ट्रीय पक्ष आहेत परंतु एका विश्लेषणावरून असे दिसून येते की इतर पक्षांकडे दोन्ही प्रमुख पक्षांपेक्षा कितीतरी जास्त आमदार आहेत. गेल्या काही निवडणुकांवर नजर टाकली, तर भाजप आणि काँग्रेसपेक्षा प्रादेशिक पक्षांकडे आमदारांची संख्या जास्त असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय पक्षांच्या आमदारांची संख्या काढली तर प्रादेशिक पक्षांच्या आमदारांची संख्या १६०० पेक्षा जास्त आहे. या शर्यतीत भाजप, काँग्रेस, आम आदमी पक्ष सर्वच मागे आहेत. गेल्या ५ वर्षातील निवडणुका पाहिल्या तर राज्यांमध्ये भाजपची ताकद कमी झाली आहे.
कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत?गेल्या ५ वर्षातील निवडणूक निकाल आणि आमदारांची संख्या पाहिली तर भाजपाकडे असलेल्या आमदारांची एकूण संख्या १ हजार ३१२ आहे. तर काँग्रेसचे ७७० आमदार आहेत. या दोन पक्षांपेक्षा इतर प्रादेशिक पक्षांची संख्या जास्त आहे.
भाजप- १३१२ आमदारकाँग्रेस- ७७० आमदारडावे- ११६ आमदारबसप- १५ आमदारआप-१६१ आमदारइतर- १६७९ आमदार
५० कोटी लोकसंख्येवर राजकीय पक्षांची स्थिती काय?अशी १३ राज्ये आहेत जिथे भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांची संख्या इतर पक्षांच्या तुलनेत कमी आहे. १३ राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचे वर्चस्व आहे. लोकसंख्येनुसार पाहिले तर हे पक्ष ५० कोटी लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. प्रादेशिक पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये बिहार, बंगाल, तामिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, झारखंड, मेघालय, नागालँड, पुडुचेरी, मिझोराम आणि सिक्कीम यांचा समावेश आहे.
३ राज्यात दोन पक्षांचे वर्चस्वभाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त जर आम आदमी पार्टीबद्दल बोलायचे झाले तर अशी २ राज्ये आहेत जिथे पक्षाच्या आमदारांची संख्या विरोधी पक्षापेक्षा जास्त आहे. पंजाब आणि दिल्लीत विरोधी पक्ष खूपच कमकुवत आहे. पंजाबमध्ये आपचे ९२ आमदार आहेत, तर दिल्लीत ६२ आमदार आहेत. यासोबतच केरळमध्ये डाव्यांचे वर्चस्व कायम आहे. येथे एलडीएफच्या आमदारांची संख्या ९७ आहे.पंजाब - आपचे ९२ आमदारदिल्ली - 'आप'चे ६२ आमदारकेरळ- ९७ -LDF आमदार
लोकसंख्येनुसार राजकीय पक्ष कुठे उभे असतात?लोकसंख्येनुसार आमदारांची संख्या पाहिली तर भाजप ४८.८ कोटी लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतो. दुसरीकडे, काँग्रेसकडे २४.४ कोटी लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणारे ७७० आमदार आहेत. प्रादेशिक पक्षांकडे १६७९ आमदार आहेत जे ५५.४ कोटी लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. बसपाकडे ०.६ कोटी लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणारे १५ आमदार आहेत, तर आम आदमी पक्षाकडे ४.५ कोटी लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणारे १६२ आमदार आहेत. सर्वाधिक लोकसंख्येच्या राज्यात भाजप आघाडीवर आहे, तर मध्य प्रदेशातील आमदारांच्या संख्येनुसार काँग्रेस सर्वाधिक लोकसंख्येच्या राज्यात प्रतिनिधित्व करते.
इतर पक्ष भाजपपेक्षा खूप पुढेअशी सात राज्ये आहेत जिथे भाजपच्या आमदारांची संख्या ५० टक्के किंवा त्याहून अधिक आहे. याशिवाय ४ राज्ये अशी आहेत जिथे काँग्रेस आमदारांची संख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे. त्याच वेळी, अशी ९ राज्ये आहेत जिथे इतर पक्षांचे सरकार आहे आणि या राज्यांमध्ये आमदारांची संख्या ८० टक्क्यांहून अधिक आहे. राज्यांच्या कामगिरीवर नजर टाकली तर येथे प्रादेशिक पक्ष भाजपपेक्षा जास्त ताकदवान दिसतात.