मणिपूरमधील वाढत्या तणावामुळे मंगळवारपासून पाच दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ही सेवा रविवार (1 ऑक्टोबर) संध्याकाळी 7.45 पर्यंत बंद राहील. पाच महिन्यांनंतर राज्यात इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली होती.
याशिवाय राज्यातील सर्व शाळाही तीन दिवसांपर्यंत बंद राहणार आहेत. यासंदर्भात, बुधवार (27 सप्टेंबर) आणि शुक्रवारी (29 सप्टेंबर) शाळांना सुट्टी असेल, अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे. तसेच, गुरुवारी (28 सप्टेंबर) ईद-ए-मिलादमुळे राज्यात अधिकृत सुट्टी आहे.
...म्हणून पुन्हा सुरू झाला तणाव - मणिपूरमध्ये जुलैपासून बेपत्ता असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृतदेहांचे फोटो सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर इंफाळमधील शाळा आणि महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी निषेध रॅली काढली. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात 30 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. यामुळे राज्यात पुन्हा तणाव वाढला आहे. या दोन्ही विद्यार्थ्यांची नावे फिजाम हेमजीत (20) आणि हिजाम लिनथोइनगांबी (17) असे आहेत.
काय म्हणाले मुख्यमंत्री एन बिरेन सिंह - राज्यातील तणावादरम्यान, मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह म्हणाले, बेपत्ता विद्यार्थ्यांच्या दुःखद मृत्यूसंदर्भात, मी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की, दोषींना पकडण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार एकत्रितपणे काम करत आहेत.
बिरेन सिंह म्हणाले, "महत्त्वाच्या तपासाला अधिक गती देण्यासाठी सीबीआयचे संचालक एका विशेष पथकासह बुधवारी सकाळी विशेष विमानाने इम्फाळला पोहोचतील. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संपर्कात आहे. जेणेकरून गुन्हेगारांना शोधता येईल.