निलक्कल : सर्व वयाच्या महिलांना प्रवेश खुला करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केरळच्या शबरीमाला डोंगरावरील सुप्रसिद्ध अयप्पा मंदिर महिनाभराच्या धार्मिक विधींसाठी बुधवारी सायंकाळी प्रथमच प्रचंड तणावाच्या वातावरणात उघडले.प्रथा आणि परंपरा पाळून फारशा महिलांनी मंदिरात जाण्याचा आग्रह धरला नाही. मात्र कुटुंबीयांसमवेत ज्या काही महिला जाताना आढळल्या, त्यांची वाहने हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी अडवून त्या महिलांना खाली उतरविले. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या निलक्कल येथे सकाळी वृत्तांकन करण्यासाठी जाणाऱ्या महिला पत्रकारांनाही निदर्शकांनी धक्काबुक्की व मारहाण केली. आंध्र प्रदेशातून मंदिरात प्रवेश करण्यासाठी आलेल्या दोन महिलांनाही परत जावे लागले.मुख्य पुजाºयांनी संध्याकाळी मंदिर उघडून दीप प्रज्ज्वलन केले व औपचारिक पूजाअर्चा केली. मुख्य पूजा गुरुवारपासून सुरू होणार आहेत. वाढता तणाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मंदिराकडे जाणाºया रस्त्यांवरील चार गावांमध्ये जमावबंदी लागू केली आहे. तसेच त्या भागात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. महिला पोलिसांची संख्याही मोठी आहे. (वृत्तसंस्था)
शबरीमालाच्या वाटेवरच तणाव, महिलांना दर्शनापासून रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 5:29 AM