श्रीरामनगरात क्षुल्लक कारणावरून तणाव अफवांचे पीक : दोन गट समोरासमोर आल्याने गोंधळ
By admin | Published: March 29, 2016 12:24 AM
जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या श्रीरामनगरात सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून दोन गट समोरासमोर आले होते. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु औद्योगिक वसाहत पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. या परिसरात सध्या शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून दंगा नियंत्रक पथकासह पोलिसांकडून सातत्याने पेट्रोलिंग केली जात आहे.
जळगाव : औद्योगिक वसाहत परिसरात असलेल्या श्रीरामनगरात सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून दोन गट समोरासमोर आले होते. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु औद्योगिक वसाहत पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. या परिसरात सध्या शांतता असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून दंगा नियंत्रक पथकासह पोलिसांकडून सातत्याने पेट्रोलिंग केली जात आहे.समजलेल्या माहितीनुसार, श्रीरामनगरात तीन दिवसांपूर्वी क्रिकेटच्या वादातून तरुणांच्या दोन गटात वाद झाला होता. हा वाद तेव्हा निवळला होता. मात्र, सोमवारी दुपारच्या सुमारास पुन्हा याच कारणावरून दोन गट आमनेसामने आल्याने शांततेला गालबोट लागले. दोन्ही गटाकडून २५ ते ३० तरुणांचे घोळके चौकात एकत्र आल्याने आरडाओरड झाली. त्यामुळे परिसरात तणाव वाढला. या घटनेची माहिती होताच, औद्योगिक वसाहत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाची पांगवापांगव केली.अफवांमुळे गोंधळहा प्रकार घडल्यानंतर औद्योगिक वसाहत परिसरात निरनिराळ्या अफवा पसरल्या. कुणी दंगल झाल्याचे तर कुणी धार्मिक फलक समाजकंटाकांनी फाडल्याचे सांगत होते. तर काहींकडून नगराचे नामकरण करण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाल्याचे सांगण्यात येत होते. पेट्रोलिंग करणार्या पोलिसांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करीत घटनेचे खरे कारण सांगितले. त्यानंतर परिसरात शांतता झाली. या घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात कोणत्याही स्वरुपाची नोंद नव्हती. मात्र, पोलीस अधिकार्यांनी घटनेला दुजोरा दिला.