ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षात चालू असलेल्या दंगलीकडे सर्वांचेच लक्ष लागले असताना पक्षाचे सायकल चिन्ह कोणाला मिळणार यासंबंधीचा निर्णय निवडणूक आयोगाने राखून ठेवला आहे.
समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव आणि मुलगा अखिलेश यादव यांच्यात सायकल चिन्हावरुन सुरु असलेली लढाई नेमकं कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगाने चिन्हाच्या दाव्यावरील सुनावणी पूर्ण केली आहे मात्र निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे पुढील कोणत्याही क्षणी हा निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात येऊ शकतो.
दरम्यान, मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्या गटांनी सायकल चिन्हावर दावा केल्यानंतर, निवडणूक आयोगाने त्यांच्याकडून दाखल झालेल्या कागदपत्रांचा अभ्यास केला. आपले समर्थक आमदार, खासदार यांचे हस्ताक्षरातले शपथपत्र आयोगाने या गटांकडे मागितले होते. कोणत्या गटाजवळ किती संख्याबळ आहे, याची माहिती या माध्यमातून समजणार आहे. सपाच्या वादग्रस्त राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाचे २२९ पैकी २०० आमदार, मोठ्या संख्येने विधान परिषद सदस्य व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
#FLASH Election Commission reserves its order in Samajwadi party's case; hearing lasted for over four hours.— ANI (@ANI_news) 13 January 2017
Arguments underway in EC, Mulayam ji's lawyer is arguing right now...Akhilesh's lawyer to speak thereafter: Naresh Agarwal #SPfeudpic.twitter.com/qk42kvTSpb— ANI (@ANI_news) 13 January 2017