शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

जीसीटी सोडा, कर्नाटकात व्हीएसटीही द्यावा लागतो; भाजपाचे १६ आमदार सरकारवर नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 3:48 PM

मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर भाजपाचे आमदार नाराज

ठळक मुद्देकर्नाटकमध्ये पुन्हा सत्तेचं नाटक?; भाजपाचे १६ आमदार नाराजमुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत आमदारांकडून नाराजी व्यक्तमुख्यमंत्र्याच्या कुटुंबाकडून सरकारी कामांमध्ये हस्तक्षेप होत असल्याचा आरोप

बंगळुरू: मध्य प्रदेशात काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्यानं काँग्रेस सरकार संकटात सापडलं असताना आता कर्नाटकातभाजपा सरकार समोरील अडचणी वाढल्या आहेत. काल कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बोलावलेल्या बैठकीत भाजपा आमदारांची नाराजी उघडपणे दिसून आली. भाजपाच्या १६ आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीबद्दल स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली. आमदारांना मिळणारा विकासनिधी, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांचा सरकारमधील हस्तक्षेप यावरही आमदारांनी आक्षेप नोंदवला.मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आयोजित केलेल्या बैठकीत १६ आमदारांनी स्पष्ट शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त केली. यामध्ये  बसनगौडा यतनल, सिद्दू सवाडी, पौर्णिमा, राजू गौडा, शिवराज पाटील, अभय पाटील, कलकाप्पा बंडी यांचा समावेश आहे. एकाचवेळी १६ आमदारांनी नाराजी व्यक्त केल्यानं येडियुरप्पा यांना धक्का बसला. कोणत्या मतदारसंघाला किती विकासनिधी देण्यात आला याची यादी देण्यात येईल, असं त्यांनी आमदारांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकीत किनारपट्टी भागातल्या १२ आमदारांनी कोणताही मुद्दा उपस्थित केला नाही. मात्र त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागून घेतली आहे. सरकारच्या कामावर हे आमदार नाराज आहेत. आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली आहे. आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या वृत्ताला एका आमदारानंदेखील दुजोरा दिला. आम्ही मतदारसंघातल्या लोकांना तुमच्या भेटीसाठी आणल्यावर त्यांच्यासमोर तुम्ही आमच्यावर ओरडता. आम्हाला काही सन्मान आहे की नाही? त्यापेक्षा लोकांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी न आणलेलं बरं किंवा मग आम्हीच मुख्यमंत्र्यांपासून दूर राहायला हवं, अशा शब्दांत कर्नाटकच्या आमदारांनी येडियुरप्पा यांच्याकडे त्यांची नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांकडून सरकारच्या कामांमध्ये हस्तक्षेप होत असल्याचा, त्या माध्यमातून भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप करणारं एक पत्रदेखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. मुख्यमंत्र्यांचे पुत्र विजयेंद्र सरकारी विभागांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. कर्नाटकात जीसीएटी सोबतच व्हीएसटीदेखील (विजयेंद्र सेवा कर) द्यावा लागतो, असा उल्लेख व्हायरल झालेल्या पत्रात आहे.  

टॅग्स :Karnatakकर्नाटकBJPभाजपाYeddyurappaयेडियुरप्पा