लोकमत न्यूज नेटवर्क :
नवी दिल्ली : भारत आणि कॅनडामध्ये निर्माण झालेल्या वादामुळे सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही देशांमधील राजकीय परिस्थिती बिघडल्याचे दिसून येत आहे. भारताने आरोप लावले आहे की, कॅनडा खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय देत आहे. परंतु, कॅनडाने याचा इन्कार केला आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजंटांचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली होती.
अनेक वर्षांचे संबंध...
भारत आणि कॅनडा यांच्यातील आण्विक सहकार्य दुहेरी कर, विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी, ऊर्जा, शिक्षण यासह इतर क्षेत्रांमध्ये करार झाले आहेत. अनेक उद्योग तसेच पर्यटन या क्षेत्रात मोठी देवाणघेवाण चालते.
भारताचे अनेक विद्यार्थी कॅनडामध्ये शिक्षण घेत आहेत. परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०२२ पर्यंत भारतातील १३ लाख २४ हजारांहून अधिक विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत होते. त्यापैकी १ लाख ८३ हजारांहून अधिक विद्यार्थी कॅनडामध्ये शिकत आहेत.
२०२२-२३ या आर्थिक वर्षात कॅनडा आणि भारत यांच्यामध्ये द्विपक्षीय व्यापार ८,१६१ दशलक्ष डॉलर्सचा होता. कॅनडाने भारतात ७० अरब डॉलरची गुंतवणूक केली आहे.
n भारताने ती फेटाळून लावली होती. त्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या उच्चायुक्तांची हकालपट्टी केली. n सुरक्षेच्या कारणास्तव भारतानेही गुरुवारी कॅनडामधील व्हिसा सेवा स्थगित केली. n या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये संबंध कसे आहेत आणि किती प्रमाणात फटका बसू शकतो याचा घेतलेला आढावा.
पर्यटन व्यवसायाला बसेल फटकाnभारत सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत २०२१ मध्ये एकूण ८०,४३७ पर्यटक कॅनडातून भारतात आले. हे प्रमाण एकूण विदेशी पर्यटकांच्या ५.३ टक्के इतके आहे.n२०२२-२३ मध्ये भारताने कॅनडाला सुमारे ४ अब्ज डॉलर्सची निर्यात केली होती. तर, कॅनडाने भारताला ४.०५ अब्ज डॉलर्सची निर्यातही केली.nभारताकडून कॅनडाला लोखंड आणि पोलाद, फार्मा उत्पादने, कपडे, अभियांत्रिकी वस्तू, मौल्यवान दगड आदींची निर्यात होते. कॅनडाकडून भारत लाकडाचा लगदा, एस्बेस्टॉस, पोटॅश, लोह भंगार, कडधान्ये, न्यूजप्रिंट, खनिजे, औद्योगिक रसायने आदी वस्तूंची आयात करतो.