शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

Railway Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांना रेल्वेमध्ये नोकरीची संधी, ७०० हून अधिक पदांसाठी भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 4:00 PM

Indian Railway Recruitment 2022: रेल्वेमध्ये काम करू इच्छिणारा पात्र उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेमध्ये एकूण ७५६ विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ईस्ट कोस्ट रेल्वे, रेल्वे रिक्रूटमेंट सेलने २०२१-२२साठी अप्रेंटीसच्या पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे.

नवी दिल्ली - रेल्वेमध्ये काम करू इच्छिणारा पात्र उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वेमध्ये एकूण ७५६ विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ईस्ट कोस्ट रेल्वे, रेल्वे रिक्रूटमेंट सेलने २०२१-२२साठी अप्रेंटीसच्या पदांवर भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार रिक्त पदांची एकूण संख्या ७५६ असून, या भरतीप्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही ७ मार्च २०२२ आहे.

या भरतीप्रक्रियेसाठी पात्र उमेदवार RRCचे अधिकृत संकेतस्थळ rrcbbs.org.in च्या माध्यमातून अर्ज करू शकतात. या भरतीप्रक्रियेमध्ये कॅरिज रिपेयर वर्कशॉप, मंचेश्वर, भुवनेश्वर येथून फिटर ४८, वेल्डर जी एंड ई ३२,  इलेक्ट्रिशियन २० पदे, मशिनिस्ट ११ पदे, रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक ६ पदे, वायरमेन ९ पदे, कारपेंटर २९ पदे, शीट मेटल वर्कर २० पदे, पेंटर ९ पदे, मेकॅनिक एमव्ही ६ पदे अशा एकूण १९० पदांची भरती होणार आहे.यासह खुर्दा रोड डिव्हिजन २३७ पदे, वाल्टेयर डिव्हिजन २६३ पदे संभलपूर मंडल ६६ पदांची भरती होणार आहे.

या पदांवर अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डाकडून दहावीची परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा ही ५० टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झालेले असले पाहिजेच. तसेच एनसीव्हीटी/एससीव्हीटी कडून संबंधित ट्रेडमध्ये नॅशनल ट्रेड सर्टिफिकेटसुद्धा असले पाहिजे.

अप्रेंटिसच्या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय १५ वर्षे आणि कमाल वय हे २४ वर्षे असले पाहिजे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाईल. अर्च करण्यासाठी उमेदवाराला १०० रुपयांचे प्रवेश शुल्क द्यावे लागेल. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेCareer Guidanceकरिअर मार्गदर्शनjobनोकरीgovernment jobs updateसरकारी नोकरी