मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात, ट्रक बनला काळ, तीन बसना मारली टक्कर, १३ जणांचा मृत्यू, ५० जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2023 09:10 AM2023-02-25T09:10:43+5:302023-02-25T09:11:14+5:30

Accident In Sidhi: मध्य प्रदेशमधील सीधी जिल्ह्यामध्ये काल रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५० जण जखमी झाले आहेत. एका भरधाव ट्रकने तीन बसना टक्कर दिल्याने हा भीषण अपघात झाला.

Terrible accident in Madhya Pradesh, truck turns into kaal, collides with three buses, 13 killed, 50 injured | मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात, ट्रक बनला काळ, तीन बसना मारली टक्कर, १३ जणांचा मृत्यू, ५० जखमी 

मध्य प्रदेशमध्ये भीषण अपघात, ट्रक बनला काळ, तीन बसना मारली टक्कर, १३ जणांचा मृत्यू, ५० जखमी 

googlenewsNext

भोपाळ - मध्य प्रदेशमधील सीधी जिल्ह्यामध्ये काल रात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५० जण जखमी झाले आहेत. एका भरधाव ट्रकने तीन बसना टक्कर दिल्याने हा भीषण अपघात झाला. या तीनही बस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कार्यक्रमाला गेलेल्या लोकांना घेऊन परतत होत्या. दरम्यान, या अपघाताबाबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, अमित शाह यांच्यासह इतर नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. 

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घटनास्थळाची पाहणी करत मृतांच्या नातेवाईकांना १० लाख, गंभीर जखमींना दोन लाख आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबातील पात्र व्यक्तींना त्यांच्या योग्यतेनुसार सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली आहे. तर माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५० लाख आणि जखमींना पाच लाख रुपये देण्याची मागणी केली आहे.   

मिळालेल्या माहितीनुसार रात्री सुमारे सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास या तीन्ही बस मोहनिया टनेलजवळ आल्या असताना एका भरधाव ट्रकने त्यांना ठोकर दिली. ही टक्कर एवढी भीषण होती की त्यात दोन बस खाली दरीत कोसळल्या. तर एक बस रस्त्यावर पलटी झाली. बसना ठोकर देणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि त्याने या तीन बसना टक्कर दिल्याचे सांगण्यात येत आहे.

या अपघातानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट केले आहे. रीवा मेडिकल कॉलेज आणि संजय गांधी रुग्णालयात जाऊन मी शोकाकुल कुटुंबीयांचं सांत्वन केलं. तसेच जखमींवरील उपचारांची माहिती घेतली आहे. आमचे जखमी भाऊ-बहिणी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो. हा अपघात हृदयविदारक आहे. या दुर्घटनेत आमचे जे सहकारी हे जग सोडून गेले, त्यांच्या कुटुंबीयांसाठी १० लाख रुपये मदत दिली जाईल.  

Web Title: Terrible accident in Madhya Pradesh, truck turns into kaal, collides with three buses, 13 killed, 50 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.