एकमेकांमध्ये कितीही मतभेद असले तरी भारतातील पुरुष आणि स्त्रिया यांच्यात आश्चर्यकारकपणे एका बाबतीत एकमत असल्याचे दिसते, ते म्हणजे - पत्नीला मारहाण करण्याचे समर्थन. अलीकडेच केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने केलेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात (2019 ते2021) नवऱ्याने केलेली मारहाण बायकांना योग्य वाटत असल्याचे धक्कादायक तथ्य समोर आले आहे.
जर पत्नी योग्य पद्धतीने वागत नसेल, तिचे कर्तव्य बजावत नसेल, तर घरगुती हिंसाचार आणि पतीने तिला मारायला काही हरकत नाही, असे बहुतांश पुरुषांबरोबर महिलांनीही मान्य केले आहे. उल्लेखनीय म्हणजे थोडे थोडके नव्हे, तर देशभरातील ४५.४ टक्के स्त्रिया व ४४ टक्के पुरुषांनी यावर सहमती दर्शविली आहे. यामध्ये दक्षिण भारतातील महिला सर्वाधिक आहेत.
सर्वेक्षणात १५ ते ४९ वयोगटांतील स्त्री-पुरुषांना विचारणा. दोन टप्प्यात झाले सर्वेक्षण देशातील एकूण ६,३६,६९९ घरांतील ७ लाख २४ हजार ११५ महिला आणि १ लाख १ हजार ८३९ पुरुषांकडून माहिती गोळा करण्यात आली. पतीने पत्नीला ७ प्रकारच्या विविध परिस्थितीत मारहाण करणे योग्य आहे का?
कानाखाली मारणे पहिल्या क्रमांकावर सुमारे २९ टक्के स्त्रियांनी मागील १२ महिन्यांत शारीरिक हिंसाचाराचा अनुभव घेतला. कानाखाली मारणे (२५ टक्के) हा हिंसेचा सर्वात सामान्य प्रकार असल्याचेही समोर आले आहे.
कोणत्या कारणासाठी मारहाण ?
पतीला न सांगता घराबाहेर पडणे - १९.२ टक्के, घराकडे किंवा मुलांकडे दुर्लक्ष करणे जेवण नीट बनविता येत नसल्यास - १३.७ टक्के, अनादर करत असल्यास, पत्नीने विश्वासघात केल्याचा संशय आल्यास, पतीसोबत वाद घालत असल्यास, पतीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देणे - ११ टक्के किमान एका कारणासाठी मारहाणीस समर्थन देणाऱ्या देशभरातील एकूण महिला ४५.४%