ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 3 - श्रीनगरमधील पंथा चौकात संशयित दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात सीआरपीएफचे सहा जवान जखमी झाले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक स्थानिक नागरिकही या गोळीबारात जखमी झाला आहे. जखमी जवानांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं कळत आहे.
आमचे जवान जम्मूहून श्रीनगरला जात अशताना दहशतवाद्यांना त्यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात सहा जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात भर्ती केलं आहे अशी माहिती सीआरपीएफचे पीआरओ बी चौधरी यांनी दिली आहे. सध्याची वेळ संवेदनशील आहे. "फुटीवरतावाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. आम्ही हाय अलर्टवर असून सीआरपीएफ आपलं कर्तव्य पार पडत आहे", असंही ते बोलले आहेत.
Gunmen attack CRPF convoy near Pantha Chowk in Srinagar, 3 CRPF personnel injured.(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/I9F5x6cHHR— ANI (@ANI_news) April 3, 2017
पंम्पोर येथे उद्योजकता विकास संस्थेपासून दीड किमी अंतरावर हा गोळीबार झाला. विशेष म्हणजे याच ठिकाणी गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली होती. तब्बल तीन दिवस ही चकमक सुरु होती. या चकमकीत चार दहशतवादी आणि एका स्थानिकाचा मृत्यू झाला होता.
It"s a sensitive time,Separatists have called for boycott of elections. We are on high alert; CRPF is doing its duty: B Chaudhary,PRO,CRPF pic.twitter.com/0ljicUcqIO— ANI (@ANI_news) April 3, 2017