नवी दिल्ली:दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी भारतात 'नो मनी फॉर टेरर'(No money for terror) या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. 18 आणि 19 नोव्हेंबर रोजी ही परिषद भारतात आयोजित केली जाईल. एनआयए (NIA)ने ही परिषद आयोजित केली आहे.
का आयोजित केली जाते?एनआयएचे डीजी दिनकर गुप्ता सांगतात की, ही परिषद काउंटर टेरर फायनान्सिंगवर आधारित आहे. पहिली परिषद फ्रान्समध्ये झाली होती. दुसरी परिषद 3 वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात झाली. त्यानंतर कोविडमुळे परिषद होऊ शकली नाही. दहशतवाद्यांना मिळणारा पैसा रोखण्यासाठीच या परिषदेचे आयोजन करण्यात येते. या परिषदेत भारत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
परिषदेत 72 देश सहभागी होणार आहेतएनआयएचे डीजी दिनकर गुप्ता सांगतात की, या परिषदेत 72 देश येणार आहेत. प्रत्येक देशाच्या प्रतिनिधींना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी मिळेल. 'नार्को दहशतवाद' हाही या परिषदेचा महत्त्वाचा मुद्दा असेल. विशेष म्हणजे, या परिषदेत पाकिस्तान-अफगाणिस्तान सहभागी होणार नाही. डीजी एनआयएच्या म्हणण्यानुसार, त्या देशांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली जाईल, ज्यांचे लोक भारतात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना आर्थिक मदत करत आहेत.
सचिव संजय वर्मा यांच्या मते, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारत-रशियाचे सहकार्य सुरूच आहे. रशियाचेही FATF मध्ये सहकार्य आहे. ही संस्था फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सपेक्षा मोठी आहे. त्यामुळे त्याची व्याप्तीही खूप मोठी असेल. जागतिक दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी नो मनी फॉर टेरर आणि FATF यांना आगामी काळात एकत्र काम करावे लागणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून दहशतवादी क्राउड फंडिंग करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याला प्रतिबंध करण्यावर या परिषदेत चर्चा होणार आहे.