शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

टेरर फंडिंग : एनआयएने जप्त केल्या 36 कोटी 34 लाखांच्या जुन्या नोटा, नऊ जण अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2017 6:28 PM

जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांना होणाऱ्या वित्तपुरवठ्या विरोधात एनआयएकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, अशाच एका कारवाईत एनआयएने 36 कोटी, 34 लाख, 78 हजार, 500 रुपयांच्या

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांना होणाऱ्या वित्तपुरवठ्या विरोधात एनआयएकडून धडक कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, अशाच एका कारवाईत एनआयएने 36 कोटी, 34 लाख, 78 हजार, 500 रुपयांच्या चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटा जप्त केल्या असून, या प्रकरणी 9 जणांना अटक केली आहे.  या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. 

याआधी एनआएने टेरर फंडिंग प्रकरणात कठोर पावले उचलताना  हिजबूल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीनच्या मुलाला अटक केली होती. जम्मू काश्मीरचा सरकारी कर्मचारी असलेला सय्यद सलाहुद्दीनचा मुलगा शाहिद युसूफ हा जम्मू काश्मीर सरकारच्या कृषी विभागात ज्युनिअर इंडिनिअर आहे. 2011 टेरर फंडिंग प्रकरणी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. शाहिद युसूफ सौदी-अरेबियामधील हिजबूल मुजाहिद्दीनचा ऑपरेटिव्ह एजाज अहमद भटच्या संपर्कात होता हे तपासात निष्पन्न झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षा यंत्रणा दहशतवाद्यांना नातेवाईक आणि हवालाच्या माध्यामातून मिळणा-या पैशांविरोधात सक्त कारवाई करत आहे.     काश्मीर खोऱ्यात अशांतता पसरवण्यासाठी फुटिरतावाद्यांना पाकिस्तानकडून आर्थिक रसद पुरवली जाते हे उघड झाले होते.  गेल्या आठ वर्षात दहशत माजवण्यासाठी पाकिस्तानने हुर्रियतच्या नेत्यांना तब्बल 1500 कोटी रुपये देण्यात आल्याचे हुर्रियत नेत्यांच्या घरांवर टाकण्यात आलेल्या छाप्यातून उघड झाले होते. मात्र लबाड हुर्रियत नेत्यांनी यातील अर्ध्या पैशातून काश्मीरमध्ये अशांतता माजवली तर अर्धे पैसे स्वत:ची मालमत्ता बनवण्यामध्ये गुंतवले. एनआयएने काही महिन्यांपूर्वी ही कारवाई केली होती.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू काश्मिरIndiaभारत