संकटं संपता संपेना! कोरोनानंतर आता Shigella बॅक्टेरियाचे थैमान; 58 जण आजारी, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 11:41 AM2022-05-05T11:41:10+5:302022-05-05T11:47:50+5:30

Shigella Bacteria : शिगेला बॅक्टेरियाची लागण झालेले 58 रुग्ण सापडले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शिगेला बॅक्टेरियाचेही रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

terror of shigella bacteria in kerala 1 dies after eating food 58 sick | संकटं संपता संपेना! कोरोनानंतर आता Shigella बॅक्टेरियाचे थैमान; 58 जण आजारी, एकाचा मृत्यू

संकटं संपता संपेना! कोरोनानंतर आता Shigella बॅक्टेरियाचे थैमान; 58 जण आजारी, एकाचा मृत्यू

Next

नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. याच दरम्यान धडकी भरवणारी माहिती समोर येत आहे. कोरोनाचा कहर सुरू असतानाच आता आणखी एक बॅक्टेरियाने थैमान घातले आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. देशात शिगेला बॅक्टेरियाची (Shigella Bacteria) प्रकरणं समोर आली आहेत.  58 जण आजारी पडले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शिगेला बॅक्टेरियाचेही रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

केरळच्या कासरगोडमध्ये फूड पॉयझनिंग मागे शिगेला बॅक्टेरिया असल्याचं म्हटलं जात आहे. एका हॉटेलमधील जेवण जेवल्यानंतर तब्बल 58 लोक आजारी पडले. तर एका मुलीचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अन्नपदार्थामुळे विषबाधा होण्याचं कारण शिगेला बॅक्टेरिया असल्याचं सांगितलं जातं आहे. कोझिकोड मेडिकल कॉलेज रुग्णालयात फूड पॉयझनिंग झालेल्या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. 

सर्व रुग्णांपैकी पाच रुग्णांचे नमुने पाठवण्यात आले होते, त्यापैकी तीन रिपोर्टमध्ये शिगेला बॅक्टेरियाचं संक्रमण असल्याचं सिद्ध झालं आहे. त्यामुळे याला बॅक्टेरियाचा उद्रेक मानलं जात आहे. बॅक्टेरियाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक ती पावलं उचलली जात आहेत. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य अधिकारी सामान्य नागरिक आणि अन्नपदार्थ विक्रेत्यांना याबाबत जागरूक करत आहेत. या आजारापासून कसा बचाव करता येईल याचे उपाय सांगितले जात आहेत. 

दूषित अन्नपाण्यामार्फत हे बॅक्टेरिया पसरतात. त्यामुळे अन्नपदार्थ, पाणी स्वच्छ असणं गरजेचं आहे. आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत विविध हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील अन्नपदार्थांची आणि पाण्याचीही तपासणी केली जात आहे. शिगेला बॅक्टेरिया असलेल्या लोकांमध्ये अतिसार, ताप आणि ओटीपोटात दुखणे ही लक्षणं आढळून येतात. शिगेलाच्या रुग्णांमध्येही 1 ते 2 दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. शिगेलाचे सौम्य रुग्ण उपचाराशिवाय बरे होऊ शकतात. परंतु गंभीर प्रकरणे धोकादायक आणि प्राणघातक देखील असू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: terror of shigella bacteria in kerala 1 dies after eating food 58 sick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Keralaकेरळ