नवी दिल्ली : कोणताही देश एकट्याच्या बळावर दहशतवादाला पराभूत करू शकत नाही. दहशतवादाचा धोका सतत वाढता असून, त्याला कोणत्याही सीमेचे बंधन नाही. त्यामुळे दहशतवादाविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायाने एकजुटीने लढा दिला पाहिजे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडण्याच्या विषयावरील तिसऱ्या मंत्रिस्तरीय परिषदेच्या समारोपप्रसंगी शहा म्हणाले की, दहशतवाद पसरविणे हे काही देश व त्यांच्या यंत्रणांचे धोरण आहे. दहशतवाद्यांचे नंदनवन असलेल्या देशांमधून सुरू असलेल्या घातपाती कारवायांबरोबरच तिथे त्यांना मिळणारी आर्थिक मदत बंद पाडण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
माथी भडकविणाऱ्या संघटनांवर कारवाईअमित शहा म्हणाले की, युवकांची माथी भडकविणाऱ्या संघटनांविरोधात भारताने कारवाईचा बडगा उगारला. प्रत्येक देशाने अशा संघटनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. सोशल मीडिया असो वा कोणताही भूप्रदेश तिथे चालणाऱ्या दहशतवादी कारवायांचा कठोर मुकाबला केला पाहिजे. त्यांना रोखण्यासाठी प्रभावी कारवाई हवी.