नवी दिल्ली : दहशतवादाविरुद्ध लढणे हाच समान उद्देश ठेवत दोन देशांचे सहकार्य बळकट करण्यासाठीच मी भारतभेटीवर आलो आहे, असे फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅन्कोईस ओलांद यांनी सोमवारी स्पष्ट केले.ओलांद यांनी राष्ट्रपती भवनाला भेट दिली असता राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रपती भवनात ओलांद यांच्या स्वागतार्थ खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ते प्रजाकसत्ताक दिनाच्या कार्यक्रमात मुख्य पाहुणे राहणार आहेत. भारत असो की फ्रान्स, दहशतवादाचे सर्व प्रकारचे धोके दोन्ही देशांभोवती घोंगावत आहेत. दोन देशांचे सहकार्य दृढ करण्याच्या उद्देशानेच मी भारतभेटीवर आलो आहे, असे ओलांद यांनी म्हटले. इको- फ्रेंडली मेट्रो सफर...इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या अंतरिम सचिवालयाचे उद्घाटन करण्यासाठी गुडगावला जाण्यासाठी मोदी आणि ओलांद यांनी इको फ्रेंडली मेट्रो सफरीचा प्रवास अनुभवला. दुपारी ३ वाजेदरम्यान हे दोन नेते दिल्ली मेट्रोमध्ये बसले तेव्हा त्यांच्यासोबत भारतीय आणि फ्रेंच अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)
‘दोन्ही देशांना दहशतवादाचा धोका’
By admin | Published: January 26, 2016 2:26 AM