शहरं
Join us  
Trending Stories
1
“देवेंद्र फडणवीसांनी मुलीची शपथ घेत मला राज्यपालपदाचा...”; एकनाथ खडसेंच्या दाव्याने खळबळ
2
“राहुल गांधींचे काम देश जोडणारे, भाजपाला लोकसभेत जनतेने उत्तर दिले, आता...”: रमेश चेन्नीथला
3
शत्रूचं ड्रोन अन् फायटर जेटच्याही हवेतच उडणार चिंधाड्या, भारतानं तयार केलं 'अप्रतिम' क्षेपणास्त्र!
4
"आनंदाचा शिधाच्या नावाखाली आनंदाचा मलिदा हे सरकार खातंय"; काँग्रेसचा महायुतीवर मोठा आरोप
5
“फडणवीसांनी माझ्या विरोधात आमदार उभे केले, आता सुट्टी नाही; हिशोब घ्यायचा”: मनोज जरांगे
6
Port Blair renamed: अंदमान-निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं; आता 'या' नावाने ओळखलं जाणार!
7
Jayant Patil : "तासगावची सीट आल्यात जमा, आता तुम्ही महाराष्ट्रात वेळ..."; जयंत पाटलांनी आरआर आबांच्या रोहितला स्पष्टच सांगितलं
8
“धनंजय मुंडेंना रात्री जाऊन मनोज जरांगेंची भेट का घ्यावी लागली?”; बजरंग सोनावणेंचा सवाल
9
महाराष्ट्रात साहेब दोनच, एक पवारसाहेब अन् दुसरे...; कोल्हेंकडून अजित पवारांचा समाचार 
10
जिंकलोsss.... संघाच्या विजयानंतर चक्क कुबड्या घेऊन आला मैदानात, केलं तुफान सेलिब्रेशन (Video)
11
महेश कोठारेंचा कोणता सिनेमा बेस्ट आहे? सचिन पिळगावकरांनी घेतलं 'या' चित्रपटाचं नाव
12
नेत्याचा महिलेसोबत संशयास्पद अवस्थेत व्हिडीओ व्हायरल; भाजपने कारवाई केली
13
कोलकाता प्रकरणात मोठा खुलासा होणार, संजय रॉय याच्या नार्को चाचणीला मिळाली परवानगी; CBI करणार चौकशी
14
'तारक मेहता'मधील टप्पू लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, झळकणार सुनील शेट्टीसोबत
15
Cricket Video, County Championship: मॅच संपायला १० मिनिटं बाकी, १० फिल्डर्सनी फलंदाजाला घेरलं अन् मग...
16
तिरुपती बालाजीचा अत्यंत प्रभावी मंत्र; नियमितपणे जप करा, अद्भूत लाभ मिळवा, शुभच होईल!
17
३ शुभ योगात परिवर्तिनी एकादशी: ‘असे’ करा व्रत, स्तोत्रांचे पठण; पाहा, पूजाविधी अन् महात्म्य
18
तुमच्या वाहनावरील दंड माफ करायचाय? मग नॅशनल लोक अदालतीला भेट द्या; प्रक्रिया समजून घ्या
19
"मराठवाड्यात २५ आमदार पाडणार", जरांगेंपाठोपाठ लक्ष्मण हाकेंची पाडापाडीची भाषा 
20
अमरावती आहे का? डेझी शाहच्या शेतातील फोटोंवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स, शिव ठाकरे म्हणतो...

पुन्हा एकदा दहशतवाद्यांचा हल्ला, कॅप्टनसह चार जवान शहीद; घेराव घातला असता केला गोळीबार शोधमोहीम अद्याप सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2024 4:00 AM

अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रीय रायफल्स व जम्मू-काश्मीर पोलिसांनी हाती घेतलेल्या विशेष मोहिमेच्या अंतर्गत देसा वन क्षेत्रातील धारी गोटे उरारबागी भागाला घेराव घालण्यात आला.

सुरेश एस. डुग्गर

जम्मू :जम्मू-काश्मीरमधील दोडा येथे सुरक्षा दल व दहशतवाद्यांमध्ये सोमवारी रात्री झालेल्या चकमकीत एका कॅप्टनसहित चार जवान शहीद तर एक जवान गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलाने दोडातील देसा येथील वन क्षेत्रात हाती घेतलेल्या मोहिमेदरम्यान ही चकमक झाली. त्यानंतर दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी ठरले असून, त्यांचा कसून शोध सुरू आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रीय रायफल्स व जम्मू-काश्मीर पोलिसांनी हाती घेतलेल्या विशेष मोहिमेच्या अंतर्गत देसा वन क्षेत्रातील धारी गोटे उरारबागी भागाला घेराव घालण्यात आला. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला असता सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत लष्कराचे कॅप्टन  ब्रिजेश थापा, नायक डी. राजेश, जवान बिजेंद्र सिंह, अजयकुमार सिंह हे चार जण शहीद झाले, तर जम्मू-काश्मीर पोलिस दलाचा जवान गंंभीर जखमी झाला आहे. पण त्याचे नाव अद्याप कळू शकलेले नाही. शहीद जवानांपैकी कॅप्टन बृजेश थापा हे दार्जिलिंगच्या लेबोंग येथील रहिवासी आहेत.

शोधमोहिमेत ड्रोन, हेलिकॉप्टरचीही मदत

धारी गोटे उरारबागी परिसरात लष्कर व पोलिसांनी आणखी कुमक मागविली व मंगळवारी सकाळपासून पुन्हा दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.

त्यासाठी ड्रोन व हेलिकॉप्टरचीही मदत घेतली आहे. हे दहशतवादी काही महिन्यांपूर्वी सीमा ओलांडून काश्मीरमध्ये आले व जंगलात दडून बसले होते.

तीन आठवड्यांत तिसरी मोठी चकमक

गेल्या तीन आठवड्यांत दोडा जिल्ह्यामध्ये झालेली ही तिसरी मोठी चकमक आहे. आठवडाभरापूर्वी कठुआ जिल्ह्यातील मचेडी वन क्षेत्रात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात पाच जवान शहीद व काही जवान जखमी झाले होते.

सोमवारी रात्री राष्ट्रीय रायफल्स व जम्मू-काश्मीर पोलिसांनी सुरू केलेल्या संयुक्त शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू झाली. त्यावेळी दहशतवाद्यांनी पळण्याचा प्रयत्न केला; पण कॅप्टन ब्रिजेश थापा यांच्या नेतृत्वाखालील तुकडीने त्यांचा पाठलाग सुरू ठेवला.

त्यानंतर पुन्हा सोमवारी चकमक झाली. त्यावेळी कॅप्टनसहित चार जवान शहीद झाले. त्यांना लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी व अन्य लष्करी अधिकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर