'पंतप्रधानांना त्या लोकांच्या किंचाळ्या ऐकू येत नाही', राहुल गांधींचा पीएम मोदींवर घणाघात...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 03:49 PM2024-06-12T15:49:34+5:302024-06-12T15:51:37+5:30

Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसांत तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत. 9 जून रोजी झालेल्या हल्ल्यात 10 भाविकांचा मृत्यू तर 40 जखमी झाले.

Terrorist Attack in Jammu: 'PM Modi can't hear the screams of those people', Rahul Gandhi attacks PM Modi | 'पंतप्रधानांना त्या लोकांच्या किंचाळ्या ऐकू येत नाही', राहुल गांधींचा पीएम मोदींवर घणाघात...

'पंतप्रधानांना त्या लोकांच्या किंचाळ्या ऐकू येत नाही', राहुल गांधींचा पीएम मोदींवर घणाघात...

Rahul Gandhi on Terrorist Attack in Jammu : रविवारी(दि.9 जून) जम्मू काश्मीरच्या रियासी भागात माता वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या बसवर दरशतवाद्यांनी गोळीबार केल्याची घटना घडली. यात 10 जणांचा मृत्यू झाला, तर 40 जण जखमी झाले. याशिवाय, कठुआ आणि डोडा भागातही हल्ले झाल्यामुळे राजकारण तापले आहे. याचे कारण म्हणजे, ज्या दिवसी हा हल्ला झाला, त्या दिवशी दिल्लीत मोदी सरकारचा शपथविधी सोहळा सुरू होता. आता यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे.

'पंतप्रधान जल्लोषात मग्न'
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर आपला संताप व्यक्त केला. राहुल गांधींनी म्हटले की, "अभिनंदन संदेशांना उत्तर देण्यात मग्न असलेल्या नरेंद्र मोदींनाजम्मू-काश्मीरमध्ये निर्घृणपणे मारल्या गेलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांच्या किंचाळ्या ऐकू येत नाहीत."

"गेल्या 3 दिवसांत रियासी, कठुआ आणि डोडामध्ये 3 वेगळ्या दहशतवादी घटना घडल्या आहेत, पण पंतप्रधान अजूनही आपल्या उत्सवात मग्न आहेत. हा देश उत्तर मागतोय...भाजप सरकारमध्ये दहशतवादी हल्ले करणाऱ्यांना का पकडले जात नाही?" असा सवाल त्यांनी या पोस्टमधून केला.

पंतप्रधानांच्या मौनावर काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न
दुसरीकडे, काँग्रेसनेही वाढत्या दहशतवादी हल्ले आणि पंतप्रधानांच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसने म्हटले की, "पाकिस्तानी नेत्यांच्या पोस्टला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान मोदींकडे वेळ आहे, पण दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करायला वेळ मिळाला नाही. मोदी सरकारच्या गेल्या 10 वर्षात राष्ट्रीय सुरक्षेला हानी पोहोचली आहे, निरपराध लोक भ्याड दहशतवादी हल्ल्यांचे बळी ठरत आहेत," अशी टीका काँग्रेसने केली.

Web Title: Terrorist Attack in Jammu: 'PM Modi can't hear the screams of those people', Rahul Gandhi attacks PM Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.