नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये सीमा सुरक्षादलाचे (बीएसएफ) दोन जवान बुधवारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झाले. गंडेरबाल जिल्ह्यातील पंडाच येथे मोटारसायकलवर आलेल्या अतिरेक्यांनी जवानांवर गोळीबार केला त्यात ते मारले गेले.घटनास्थळ येथून १७ किलोमीटरवर आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. हल्ल्यात जखमी झालेल्या या जवानांना येथील सौरा येथे असलेल्या एसकेआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे एका जवानाला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर दुसरा जखमांमुळे मरण पावला. दोन्ही जवानांची वये ३५ व ३६ वर्षे आहेत. हल्ला झाला तो भाग घेरण्यात आला असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
हिज्बुल मुजाहिदीनच्या अतिरेक्याला अटकजम्मू : हिज्बुल मुजाहिदीनचा अतिरेकी रुस्तम अली याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) जम्मू आणि काश्मीरच्या किश्तवार जिल्ह्यात हांजाला भागात मंगळवारी रात्री अटक केली. अली याच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते चंदर कांत शर्मा आणि त्यांचा वैयक्तिक सुरक्षा अधिकाºयाच्या हत्येत सहभागी असल्याचे आरोपपत्र एनआयएने दाखल केले आहे, असे अधिकाºयाने बुधवारी सांगितले. या हत्या एप्रिल २०१९ मध्ये झाल्या होत्या. चंदर कांत शर्मा यांच्या हत्येप्रकरणी जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी गेल्या २३ सप्टेंबर रोजी हिज्बुल मुजाहिदीनचे दहशतवादी निस्सार अहमद शेख, निशाद अहमद आणि आझाद हुस्सेन यांना अटक केली होती. भाजपचे राज्य सचिव अनिल परिहार यांची २०१८ मध्ये हत्या झाली होती. परिहार, शर्मा व त्यांचा सुरक्षा अधिकारी यांच्या झालेल्या हत्येने किश्तवारमध्ये निदर्शने झाली होती. किश्तवारमध्ये दहशतवादी कारवायांना पुन्हा तोंड फोडण्यासाठीया हत्यांचा कट त्या भागात प्रदीर्घ काळ जिवंत राहिलेला हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर जहांगीर सरुरी याने रचला होता, असे अधिकाºयाने सांगितले.