काश्मीर- जम्मू-काश्मीरमधल्या किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांनी रुग्णालयात घुसून फार्मासिस्ट आणि RSS नेत्याची हत्या केली आहे. यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानावरही गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. गंभीर जखमी असलेल्या आरएसएस नेत्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आरएसएस नेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पीएसओ जवान या गोळीबारात शहीद झाला आहे. मंगळवारी दुपारी किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांनी घुसून फार्मासिस्ट व आरएसएस नेते चंद्रकांत शर्मा आणि त्यांचे पीएसओ यांच्यावर गोळ्या झाडल्या. पीएसओ जवान घटनास्थळीच शहीद झाला. RSS नेत्याला एअरलिफ्ट करून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज(जीएमसी)मध्ये आणण्यात आलं आहे. उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये भाजपाचे प्रदेश सचिव अनिल परिहार आणि त्यांचे मोठे भाऊ अजित परिहार यांची निर्दयतेनं हत्या करण्यात आली होती. एएनआय या प्रकरणात चौकशी करत आहे.
जम्मू-काश्मीरमधल्या किश्तवाडमध्ये दहशतवादी हल्ला, RSS नेत्याची हत्या, जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 5:40 PM