ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 27 - जम्मू आणि काश्मीरच्या राज्य सरकारमधील मंत्री फारुख आंद्राबी यांच्या घरावर रविवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस जखमी झाला. मात्र ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा आंद्राबी घरात नसल्याने ते या हल्ल्यातून बचावले.
पीडीपीचे नेते असलेले फारुख आंद्राबी जम्मू आणि काश्मीर सरकारमध्ये हज आणि वक्फ मंत्री आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित दहशतवाद्यांनी अनंतनागमधील दूरू येथे असलेल्या आंद्राबी यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या पोलिसाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर दहशतवादी मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे घेऊन आले होते. त्यांनी मंत्र्यांच्या घरात घुसून गोळीबार केला. तसेच सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांच्या चार बंदुका घेऊन दहशतवादी पसार झाले. मात्र सुदैवाने ज्यावेळी हल्ला झाला तेव्हा आंद्राबी घरात नव्हते. आंद्राबी हे जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचे जवळचे नातेवाईक आहेत.
Terrorists attack residence of J&K minister Farooq Andrabi in Anantnag. 1 policeman injured.Andrabi was not at his residence.Details awaited— ANI (@ANI_news) March 26, 2017