शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दहशतवादी परत जा; प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासमोर विद्यार्थ्यांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 9:37 AM

भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत

भोपाळ: विमानातील प्रवाशांसोबत हुज्जत घातल्यानंतर भाजपा खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. काल ठाकूर यांनी भोपाळमधील एका विद्यापीठातील आंदोलनकर्त्या विद्यार्थिनींची भेट घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी काही विद्यार्थ्यांनी ठाकूर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. विद्यार्थ्यांनी 'दहशतवादी परत जा' अशा घोषणा दिल्यानं वातावरणात काही काळ तणाव निर्माण झाला. माखनलाल चतुर्वेदी राष्ट्रीय विद्यापीठात हा प्रकार घडला. विद्यापीठात शिकणाऱ्या श्रेया पांडे आणि मनू शर्मा या दोन विद्यार्थिनी आंदोलन करत होत्या. हजेरी कमी असल्यानं केलेल्या निलंबनाविरोधात त्यांचं आंदोलन सुरू होतं. त्यांच्या भेटीसाठी ठाकूर विद्यापीठात पोहोचताच काही विद्यार्थीदेखील तिथे पोहोचले. यातले बहुतांश विद्यार्थी नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडियाचे (एनएसयूआय) कार्यकर्ते होते. त्यांनी ठाकूर यांना घेराव घालत दहशतवादी परत जा, अशा घोषणा दिल्या. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत एनएसयूआयचे कार्यकर्ते प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याविरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहेत. यानंतर काही भाजपा समर्थकदेखील तिथे पोहोचले. त्यांनी ठाकूर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर वातावरणातला तणाव निवळला.  

टॅग्स :Sadhvi Pragya Singh Thakurप्रज्ञा सिंह ठाकूरBJPभाजपा