शहरं
Join us  
Trending Stories
1
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
2
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
3
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
4
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
6
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
7
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
9
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
12
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
13
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
14
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
16
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
17
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
18
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
19
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
20
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!

हमाससारखा हल्ला करा, पंतप्रधान, गृहमंत्र्यांना टार्गेट करा; काश्मीर फाईटची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 5:43 PM

या भयंकर स्थितीत या दहशतवाद्यांनी बाहेर यायला हवे आणि त्याच ठिकाणांवर हल्ला करावा जिथं सर्वाधिक नुकसान होईल.

नवी दिल्ली - दहशतवादी संघटना काश्मीर फाइटचं एक पत्र पुढे आल्यानं खळबळ माजली आहे. ज्याप्रकारे हमासनं काही दिवसांपूर्वी इस्त्रायलवर हल्ला केला तसाच हल्ला आम्ही करू. पर्यटक, परप्रांतीय लोक आणि सुरक्षा दलांना निशाणा बनवू. त्याचसोबत पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना टार्गेट करू असा इशारा काश्मीर फाईटनं दिला आहे. 

काश्मीर फाईटनं त्यांच्या दहशतवादी सदस्यांना म्हटलंय की, हायप्रोफाईल व्यक्तींना निशाणा बनवा.गाझा इथं होणारा नरसंहार हा त्या सर्व लोकांचे डोळे उघडणारा असावा जे संयुक्त राष्ट्र अथवा अन्य मानवाधिकारी संघटनांकडून अपेक्षा ठेवतायेत.जर हे गाझातील नरसंहारासाठी तयार असतील तर भविष्याबाबतही त्यांनी विचार करावा. आता वेळ आलीय IIOJK च्या सशस्त्र दहशतवाद्यांनी त्यांची रणनीती बदलायली हवी आणि भारतीय प्रशासन आणि त्यांच्या हायप्रोफाईल लोकांना टार्गेट करायला हवे त्यांनी पत्रात सांगितले.तसेच या भयंकर स्थितीत या दहशतवाद्यांनी बाहेर यायला हवे आणि त्याच ठिकाणांवर हल्ला करावा जिथं सर्वाधिक नुकसान होईल. टार्गेटवर लक्ष ठेवा आणि समुहांना अलर्ट करा असं पत्रात म्हटलं आहे. 

धमकीच्या या पत्रात काय आहे?

  • हायप्रोफाईल व्यक्ती, ज्यांचा प्रभाव प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जम्मू काश्मीरमध्ये आहे त्यांना टार्गेट करा
  • भारत सरकारच्या रणनीती ठरवणाऱ्या संस्थांना लक्ष्य करा.
  • काहीतरी मोठा विचार करा, आपले लक्ष्य हे पंतप्रधान, गृहमंत्र्यांवर ठेवावे
  • सुरक्षा दलांच्या कार्यालयांना तणावाखाली ठेवा
  • अशा पर्यटकांना टार्गेट करा. ज्यांच्या माध्यमातून जम्मू काश्मीरात सर्वसामान्य परिस्थिती असल्याचे दाखवून देतायेत
  • परप्रांतीय लोकांची ओळख पटवा आणि त्या लोकांवर हल्ला करा
  • ज्याठिकाणी सर्वात जास्त त्रास होईल तिथे रस्त्यावर रक्त सांडा
  • कुठल्याही गोष्टीत स्पष्टता आणा. जे केले ते का केले हे सांगा. प्रत्येक हल्ल्यावेळी ते स्पष्ट करा.  
टॅग्स :terroristदहशतवादीIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धJammu Kashmirजम्मू-काश्मीर