शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

ग्रेनेड फेकले, १२ मिनिटं गोळीबार... ५ जवान शहीद; कठुआ दहशतवादी हल्ल्याची Inside Story

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 8:59 AM

Jammu Kashmir : कठुआमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर मोठा हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद झाले, तर ५ जवान जखमी झाले. जम्मूमध्ये गेल्या एका महिन्यातील हा सहावा मोठा हल्ला आहे.

जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर मोठा हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात ५ जवान शहीद झाले, तर ५ जवान जखमी झाले. जम्मूमध्ये गेल्या एका महिन्यातील हा सहावा मोठा हल्ला आहे, तर कठुआ जिल्ह्यात महिनाभरातील हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे.

बिलावरमधील माचेडी-किंडली-मल्हार रोडवर हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे. येथे बदनोता गावाजवळ माचेडी-किंडली-मल्हार रस्त्यावर लष्कराच्या वाहनातून सुरक्षा दलाचे १० जवान नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. मल्हार रस्त्यालगतच्या टेकडीवर दहशतवाद्यांनी ठाण मांडले होतं. लष्करी वाहन पुढे जाताच दहशतवाद्यांनी आधी ग्रेनेड फेकले आणि नंतर आधुनिक शस्त्रांनी गोळीबार सुरू केला.

हल्ल्यामध्ये जवळपास ३ दहशतवादी सहभागी असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणांना आहे. तसेच हल्ल्यावेळी स्थानिक गाईडही दहशतवाद्यांसोबत असण्याची शक्यता आहे. काश्मीर टायगर्स या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. संघटनेचं म्हणणं आहे की, या हल्ल्यात त्यांच्या कॅडरने M4 असॉल्ट रायफल, स्निपर, ग्रेनेड आणि इतर शस्त्रे वापरली आहेत.

३ दहशतवाद्यांच्या हत्येचा बदला 

दहशतवादी संघटनेने आगामी काळात असे आणखी हल्ले करण्याची शपथ घेतली आहे. हा हल्ला २६ जून रोजी डोडा येथे ३ दहशतवाद्यांच्या हत्येचा बदला असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे. काश्मीर टायगर्स ही जैश-ए-मोहम्मदशी संबंधित दहशतवादी संघटना आहे. यापूर्वी या संघटनेने जम्मू भागातील कठुआ, रियासी आणि डोडा येथेही हल्ले केले होते.

बसवर दहशतवाद्यांनी केला हल्ला 

९ जून रोजी रियासी जिल्ह्यातील शिव खोडी मंदिरातून भाविकांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर बस दरीत पडली. यामध्ये ९ जणांना जीव गमवावा लागला, तर ४१ जण जखमी झाले.

दहशतवाद्यांचा शोध सुरू 

दहशतवादी हा हल्ला केल्यानंतर जंगलात पळून गेले. शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलाच्या आणखी तुकड्या पाठवण्यात आल्या आहेत. कठुआ जिल्ह्यात महिनाभरातील हा दुसरा मोठा हल्ला आहे. यापूर्वी १२ आणि १३ जून रोजी अशाच चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले होते आणि एक CRPF जवान शहीद झाला होता.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी