पुलवामा-
दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे रविवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या तुकडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांकडून नाक्यावर तपासणी करत असताना दहशतवाद्यांनी सुरक्षादलावर हल्ला केला. ही घटना गोंगू क्रॉसिंग परिसरातील आहे.
दहशतवाद्यांनी अचानक हल्ला चढवल्यानंतर सुरक्षा दलानंही तातडीनं प्रत्युत्तर दिलं आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दहशतवाद्यांविरोधात शोध मोहिम सुरू असून यंत्रणा अर्लट मोडवर आहेत. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गोंगू क्रॉसिंगजवळ सर्क्युलर रोडवर रविवारी दुपारी पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांची संयुक्त तुकडी चेकपोस्टवर तैनात होती. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची आणि चालकांची चौकशी केली जात होती. याचवेळी दहशतवाद्यांनी हल्ला चढवला यात एका जवानाचा मृत्यू झाला आहे.
जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी कॉसिंगजवळच असलेल्या एका सफचंदाच्या फगबागाच्या झुडपाच्या आत लपून फायरिंग केली. या हल्ल्यात सीआरपीएफचे जवान विनोद कुमार जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तोवर खूप उशीर झाला होता. डॉक्टारांनी त्यांना मृत घोषीत केलं आहे. दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी संपूर्ण परिसरात नाकाबंदी दावण्यात आली आहे.