नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या नगरोटामध्ये आज सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांनी ४ दहशतवाद्यांचा खात्मा केला. या दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा आढळून आल्यानं ते मोठा हल्ला घडवण्याच्या तयारीत होते अशी दाट शक्यता सुरक्षा दलातल्या सुत्रांनी वर्तवली. याच पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. नियंत्रण रेषा (एलओसी) ओलांडणारे दहशतवादी जिवंत राहणार नाहीत, असं नरवणे म्हणाले.एलओसी ओलांडणारे दहशतवादी जिवंत राहणार नाहीत. सीमा ओलांडणारा एकही दहशतवादी माघारी परतू शकणार नाही, अशा शब्दांत नरवणेंनी पाकिस्तान आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांना अतिशय स्पष्ट संदेश दिला आहे. आज सकाळी नगरोटामध्ये करण्यात आलेल्या कारवाईचं त्यांनी कौतुक केलं. लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि निमलष्करी दलानं अतिशय उत्तम ताळमेळ राखून नगरोटामध्ये कारवाई केल्याचं लष्करप्रमुख म्हणाले.एलओसीवर कोणताही गोळीबार नाही; 'पिन पॉईंट स्ट्राईक'च्या चर्चेवर लष्कराचं स्पष्टीकरणसुरक्षा दलांनी नगरोटामध्ये केलेली कारवाई अतिशय यशस्वी झाली. सर्व सुरक्षा दलांमध्ये किती उत्तम ताळमेळ होता, ते या कारवाईवरून दिसतं. नगरोटामधील ऑपरेशन शत्रू आणि दहशतवाद्यांसाठी अतिशय स्पष्ट संदेश आहे. जो कोणी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल, त्याला याच पद्धतीनं उत्तर मिळेल. सीमा ओलांडून येणारा एकही दहशतवादी जिवंत परत जाणार नाही, असं नरवणे म्हणाले.नगरोटामध्ये भारतीय सुरक्षा दलांच्या कारवाईत दहशतवाद्यांचा खात्माआज पहाटे ४ वाजून २० मिनिटांनी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. दहशतवादी एका ट्रकमधून येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस दलाचा विशेष अभियान समूह (एसएसजी), केंद्रीय राखीव पोलीस दलासह (सीआरपीएफ) लष्कराचे जवान अलर्टवर होते. सुरक्षा दलांनी टोल नाक्याजवळ ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरू झालेल्या चकमकीत चार दहशतवादी मारले गेले. त्यांच्याकडून ११ एके-४७ रायफल, ३ पिस्तुलं, २९ ग्रेनेड आणि अन्य उपकरणं जप्त करण्यात आली.
एलओसी ओलांडणारे दहशतवादी जिवंत राहणार नाहीत; 'नगरोटा ऑपरेशन'नंतर लष्करप्रमुखांचा इशारा
By कुणाल गवाणकर | Published: November 19, 2020 9:18 PM