शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा उपद्रव सुरूच, जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2017 12:46 PM

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या बांदीपो-यातील हाजिन येथे आज सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या बांदीपो-यातील हाजिन येथे आज सुरक्षा दलाचे जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. परंतु या दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एक पोलीस शिपाई शहीद झालाय. बांदीपो-यातील या चकमकीनंतर जवानांवर दगडफेकही करण्यात आली. जवानांच्या चकमकीत ठार झालेल्या एका दहशतवाद्याचं नाव अली असल्याचं उघड झालं आहे. दोन दहशतवादी बांदीपो-यातील हाजिनच्या मीर मोहल्यात लपल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाली. त्यानंतर जवान व काश्मीर पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत मीर मोहल्ला परिसराला घेराव घातला. निसटण्याचे मार्ग बंद झाल्याचे समजताच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. या चकमकीत जहीर अहमद हा पोलीस शिपाई शहीद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून लष्करानं दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोहीमही राबवली आहे. लष्कराने ऑपरेशन ऑलआऊट मोहिमेंतर्गत गेल्या काही महिन्यांमध्ये काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. कारवाईमध्ये काश्मीर खोऱ्यात वावरणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून शोधून कंठस्नान घालण्यात येत आहे. दरम्यान, काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांचे सर्वात सुरक्षित आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोपियाँ परिसरावर चढाई करण्याची तयारी लष्कराकडून करण्यात येत आहे. या भागात काही दिवसांपासून लष्कराच्या हालचाली वाढल्या असून, तेथे लष्कराचे नवे तळ उभारण्यात येत आहेत. तसेच सीआरपीएफची राखीव तुकडीही येथे दाखल झाली आहे.  दक्षिण काश्मीरमधील शोपियाँ भाग दहशतवाद्यांसाठी सर्वात सुरक्षित भाग मानला जातो. या परिसरात दहशतवादी मोकळेपणाचे फिरताना दिसायचे. मात्र आता येथे लष्कराच्या  हालचाली वाढल्या आहेत. लष्कराच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, "यावर्षी एप्रिल महिन्यात लष्कराने शोपियाँमधील हेफ शीरमाल भागात घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावेळी लष्कराला मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पोलीस, लष्कर आणि सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स(सीआरपीएफ) च्या अधिकाऱ्यांनी शोपियाँमधील परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी डोळ्यात तेल घालून पहारा देण्यास सुरुवात केली." शोपियाँ जिल्हा पीर पंजाल पर्वताच्या दक्षिणेस आहे. तसेच जम्मू विभागातील डोडा, किश्तवाड आणि पुंछ परिसरात घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांच्या मार्ग आहे.  गेल्यावर्षी 8 जुलै रोजी हिज्बुल मुजाहिद्दीनचा पोस्टर बॉय असलेल्या बुऱ्हाण वानी याला लष्कराने कंठस्नान घातल्यानंतर या भागातून 37 तरुण बेपत्ता झाले होते. या सर्व तरुणांनी दहशतवादाचा मार्ग पकडून ते दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  दरम्यान .या भागात लष्कराच्या हालचाली वाढल्यापासून गुप्त खबरी मिळू लागल्या असून, अनेक मोठे दहशतवादी मारले गेले आहेत. त्यामध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये दहशतवाद्यांची भर्ती करणारा शेर मलदेरा आणि या दहशतवादी संघटनेला अर्थपुरवठा करणारा वासीम शाह यांचा समावेश आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या हंदवाडामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा पथकांमध्ये चकमक सुरु आहे. एका दहशतवाद्याला ठार करण्यात सुरक्षा पथकांना यश आले होते. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू काश्मिरTerror Attackदहशतवादी हल्ला