शोपियां : जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात रविवारी सकाळपासूनच दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांत मोठी चकमक सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, जवानांनी 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. अजूनही दोन ते तीन दहशतवादी लपून बसले असल्याची शक्यता आहे. आज सकाळपासूनच यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.
सुरुवातीला झालेल्या गोळीबारानंतर रेबन गावात सुरू अलेला गोळीबार काही वेळासाठी थांबा होता. तो पुन्हा सुरू झाला आहे. सुरक्षा दलाचे जवान दहशतवाद्यांना शोधत असतानाच, दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमक उडाली.
CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...
सांगण्यात येते, की हिजबूलचा एक मोठा दहशतवादी गट सुरक्षा दलापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एका घरात जाऊन लपला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिजबूलचे काही दहशतवादी घरात लपलेले आहेत. सुरक्षा दलाच्या जवानांनी त्यांना चारही बाजूंनी घेरले आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी काही इनपूट मिळाल्यानंतर पोलीस, लष्कराच्या 01 RR आणि सीआरपीएफने संयुक्त अभियान सुरू केले आणि शोपियांच्या रेबन गावाला घेरून तेथे शोधमोहीम सुरू केली. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेही दहशतवाद्यांशी चकमक उडाल्याची पुष्टी केली आहे.
जाणून घ्या, काय आहेत पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले 'आमने-सामने'