बालासोर (ओडिशा) : अण्वस्त्र वाहक भारतीय बनावटीच्या पृथ्वी-२ या क्षेपणास्त्राची ओडिशातील चांदीपूरनजीकच्या एकात्मिक चाचणी तळावरून यशस्वी चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३५० किलो मीटर आहे. फिरत्या प्रक्षेपकातून शुक्रवारी सकाळी ९.५० वाजता हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. ५०० ते १ हजार किलो अण्वस्त्रे वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. यात प्रगत दिशादर्शक प्रणालीचा वापर करण्यात आलेला असल्याने हे क्षेपणास्त्र अचूक वेध घेते. २१ नोव्हेंबर २०१६ रोजी ही यशस्वी चाचणी पार पडली होती. २००३ मध्ये लष्करात सामील करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केले आहे. (वृत्तसंस्था)
‘पृथ्वी-२’ ची चाचणी यशस्वी
By admin | Published: June 03, 2017 1:29 AM