कल चाचणी परीक्षा.....
By admin | Published: February 08, 2016 10:55 PM
शेठ ला.ना. विद्यालय
शेठ ला.ना. विद्यालयशेठ ला. ना. विद्यालयात कल चाचणी परीक्षेसाठी ४३९ विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. मात्र परीक्षेच्या पहिल्या दिवशी दुपारी विद्यालयातला परीक्षेसंबंधातील सीडी, विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र मिळालेले नव्हते. ऑनलाईन प्रवेशपत्र विद्यालयाने उपलब्ध करून घेतले आहे. २०-२० विद्यार्थ्याच्या बॅचमध्ये १० रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. प्रत्येक बॅचच्या परीक्षेनंतर आर्धा ते एक तासा अपलोड करण्यासाठी द्यायच्या आहे. त्यामुळे दिवसाला तीन बॅच मधून ६० विद्यार्थ्यांची परीक्षा होईल. विद्यालयात शिक्षण विभागातर्फे वार्षिक शैक्षणिक तपासणी सुरू असल्याने व कीट उशिरा मिळाल्याने परीक्षा उशिरा घेण्यात येणार असल्याने उपमुख्याध्यापिका वैशाली चौधरी यांनी सांगितले.आर. आर. विद्यालयविद्यालयाला परीक्षासंबंधातील कीट सोमवारी दुपारी उपलब्ध झाले. पाचशे विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ आहेत. बॅच तयार करण्याचे नियोजन सुरू होते. २५-२५ विद्यार्थ्यांची बॅच असेल दिवसातून तीन अशा २० बॅच मध्ये परीक्षा घेण्यात येतील. प्रत्येक परीक्षे नंतर आर्धा तासाचा अवधी द्यावा लागणार असल्याने दिवसभरातून तीन बॅच शक्य आहे. त्यातच या विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रात्याक्षिक, माहिती संप्रेशन तंत्रज्ञान व कल चाचणी एकाच वेळेत आल्याने परीक्षा घेण्यासाठी वेळ लागणार आहे.विद्यार्थ्यांना एक नंतर एक अशा तीन परीक्षा द्याव्या लागणार असल्याने त्याचे नियोजन सुरू आहे. या परीक्षेस ९ रोजी सुरुवात होणार असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक डी.एस. सरोदे यांनी सांगितले.ए.टी. झांबरे विद्यालयविद्यालयात २८५ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ आहेत. रोज ३०-३० विद्यार्थ्यांच्या पाच बॅचेसचे नियोजन आहे. कीट उशिरा मिळाल्याने. मंगळवार पासून परीक्षांची सुरुवात होणार असल्याचे विद्यालयाचे किरण नेहते यांनी सांगितले.शानभाग विद्यालयविद्यालयात २१९ विद्यार्थी प्रविष्ठ आहेत. ३० विद्यार्थ्यांची एक बॅच प्रमाणे नियोजन होणार आहे. प्रत्येक बॅच नंतर एक तासाचा विलंब असेल. तीन दिवसात परीक्षा आटोपतील. ९ रोजी परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती विद्यालयाचे शिक्षण समन्वयक ज्ञानेश्वर पाटील यांनी दिली.भगीरथ विद्यालयविद्यालयातील २९८ विद्यार्थी कल परीक्षा देणार आहे. एका वेळेस नऊ अशा सहा बॅचमध्ये परीक्षा घेण्याचे नियोजन आहे. ऑनलाईन परीक्षां घेण्यात येणार आहे. मात्र लोडशेडिंग व काही अडचणी बघता ऑफलाईन परीक्षा घेण्याची मुभा आहे. उद्यापासून परीक्षा घेण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापिका ए.एम.चौधरी यांनी सांगितले.