दवर्ली खूनी हल्ला प्रकरणात डॉक्टरांची साक्ष
By admin | Published: September 08, 2015 2:08 AM
मडगाव : म दवर्ली येथील अल्ताफ नंदेहळळी व मेहबुब खान यांच्यावरील खूनी हल्ला प्रकरणात हॉस्पिसियोचे डॉक्टर समीर नाईक व डॉ. अर्नेस्ट रॉड्रिक्स यांची साक्ष अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष पी.व्ही.सावईकर यांनी नोंदवून घेतली.सरकारी वकील सुभाष देसाई यांनी या साक्षिदारांची सरतपासणी घेतली.
मडगाव : म दवर्ली येथील अल्ताफ नंदेहळळी व मेहबुब खान यांच्यावरील खूनी हल्ला प्रकरणात हॉस्पिसियोचे डॉक्टर समीर नाईक व डॉ. अर्नेस्ट रॉड्रिक्स यांची साक्ष अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष पी.व्ही.सावईकर यांनी नोंदवून घेतली.सरकारी वकील सुभाष देसाई यांनी या साक्षिदारांची सरतपासणी घेतली.16 फेब्रुवारी 2013 रोजी आपण संध्यकाळी 7.40 वाजता हल्ल्यात जखमी झालेले अल्ताफ व मेहबुब यांच्यावर उपचार केले व त्यांना पुढील उपचारासाठी बांबोळीला गोमेकॉत पाठवून देण्याची शिफारस केली. दोघांनाही झालेल्या जखमा लोखंडी सळयांनी हल्ला केला असात होउ शकतात असा अभिप्राय डॉ. नाईक यांनी दिला.डॉ. अर्नेस्ट रॉड्रिक्स यांनी सांगितले की, 4 मार्ज 2013 रोजी आपण अल्ताफ याची वैदयकीय तपासणी केली, तेव्हा तो गंभीर जखमी झाल्याने अंथरुणाला खिळून होता. तसेच पोलिसांना जवाब देण्याच्या मनस्थितीत नव्हता. इब्राहीम सज्जू, मेहबुब शेख, इम्तियाज रेहमान, मोहमद जियाउल्ला, अबु शेख यांनी 16 फेब्रुवारी 2013 रोजी संध्याकाळी कटटे- दचर्ली येथील अल्ताफ व मेहबुब यांच्या दुकानावर जाउन दोघांच्याही दुकानाची नासधूस केली होती. त्यांच्यावर लोखंडी सळयांनी हल्ला केला असता, अल्ताफ व मेहबुब हे दोघेही जखमी झाले होते. इब्राहिम सज्जू याच्या पत्नीने तो नियमित मारझोड करत असल्याने, त्याच्यापासून काडीमोड घेतला होता. अल्ताफ व मेहबुब यांची तिला फूस असल्याच्या संशयावरुन हा जिवघेणा हल्ला झाला होता. मायणा - कुडतरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गुरुदास कदम यांनी या प्रकरणाचा तपास केला होता. (प्रतिनिधी)