केंद्राची विशेष समिती : डॉ. आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीसाठी योजनांचा धडाकानवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील वारसा हक्कावरून भारतीय जनता पार्टी (भाजपा) आणि काँग्रेस पक्षात रस्सीखेच सुरू असतानाच बाबासाहेबांची १२५वी जयंती देशभरात मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, ही समिती विविध मंत्रालय, विभाग, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डॉ. आंबेडकर जयंती आणि त्याअनुषंगाने त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रमांच्या आयोजनांबाबत सल्ला देईल. या समितीत राजनाथसिंग, अरुण जेटली, सुषमा स्वराज, एम. वेंकय्या नायडू, स्मृती इराणी, सदानंद गौडा, रामविलास पासवान आणि सुरेश प्रभू या वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, डॉ. आंबेडकरांची विचारसरणी आणि सिद्धान्तांचा प्रसार करण्याच्या दृष्टीने सामाजिक न्याय मंत्रालयाच्या वतीने १६ मोठे प्रकल्प राबविले जाणार असून, याची माहिती बैठकीत देण्यात आली. भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांतर्फे दलित समुदायाला आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नांतर्गत यंदा मोठ्या प्रमाणात डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात येणार आहे. या वर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि या महत्त्वाच्या हिंदीभाषिक राज्यात स्वबळावर सत्ता काबीज करण्यासाठी दलित आणि महादलित समुदायाची मने जिंकण्याचा प्रयत्न भाजपाने चालवला आहे. भारताच्या जडणघडणीत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या म. गांधी, डॉ. आंबेडकर व सरदार वल्लभभाई पटेल या महापुरुषांचा आदर्श जनतेपुढे ठेवण्यासाठी आपले सरकार काय करणार आहे, याची ढोबळ रूपरेषा पंतप्रधान मोदी यांनी भाषणात केली होती. त्यानुसार त्यांनी इंदू मिलची जागा आंबेडकर स्मारकासाठी देण्याचा कित्येक वर्षे भिजत पडलेला प्रश्न मार्गी लावला व गुजरातमध्ये सरदार पटेलांचा भव्य पुतळा उभारण्याची योजनाही जाहीर केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)च्सरकारच्या या व्यापक योजनेमागे राजकीय हेतू दडला असल्याचा प्रसाद व सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी इन्कार केला. परंतु मध्य प्रदेशच्या महू या डॉ. आंबेडकरांच्या जन्मगावी मंगळवारी काँग्रेसतर्फे आंबेडकर जयंतीच्या देशव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ करणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मात्र त्यांनी हल्लाबोल केला. च्राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाने आंबेडकरांचा कधीही आदर केला नाही. प्रदीर्घ काळ सत्तेत असतानाही काँग्रेसने ना त्यांना भारतरत्न प्रदान केले ना त्यांचे तैलचित्र संसदेत लावले. मग आताच महूला जाण्याचे कारण काय, असा सवाल या मंत्रिद्वयांनी उपस्थित केला.च्सरकारच्या या व्यापक योजनेमागे राजकीय हेतू दडला असल्याचा प्रसाद व सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांनी इन्कार केला. परंतु मध्य प्रदेशच्या महू या डॉ. आंबेडकरांच्या जन्मगावी मंगळवारी काँग्रेसतर्फे आंबेडकर जयंतीच्या देशव्यापी कार्यक्रमाचा शुभारंभ करणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मात्र त्यांनी हल्लाबोल केला. च्राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाने आंबेडकरांचा कधीही आदर केला नाही. प्रदीर्घ काळ सत्तेत असतानाही काँग्रेसने ना त्यांना भारतरत्न प्रदान केले ना त्यांचे तैलचित्र संसदेत लावले. मग आताच महूला जाण्याचे कारण काय, असा सवाल या मंत्रिद्वयांनी उपस्थित केला.अशा आहेत विविध योजना दिल्लीत १५, जनपथ येथे सुमारे १९७ कोटी रुपये खर्चून आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र100 विद्यार्थ्यांना शासकीय खर्चाने युनिव्हर्सिटी आॅफ कोलंबिया आणि लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षणासाठी पाठविणार14 एप्रिलला राष्ट्रीय बंधुभाव समरसता दिवस26 अलीपूर, दिल्ली येथे आंबेडकर स्मारकडॉ. आंबेडकर स्मृती टपाल तिकीट व शिक्केआंबेडकर फाउंडेशनतर्फे व्याख्यानमालाबाबासाहेबांशी महत्त्वाच्या स्थळांचा विकास